समाज माध्यमातही होतोय मतदानाचा जागर


परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण 
 दि.२१ - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाप्रमाणेच आता समाज माध्यमावरही जास्तीत जास्त मतदान करावे याबाबत आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मतदान करण्याबाबतचे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत.व्हॉटसऍपच्या स्टेटसवर मतदान करण्याचे संदेश ठेवले जात आहेत.
    लोकसभा निव्वडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. परभणी मतदारसंघात येणाऱ्या परतूर विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेली निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
   लोकसभा निववडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने आटोकात प्रयत्न केले जात आहेत. शहरातील प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी बॅनर लावून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ' स्विप ' कार्यक्रमांतर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत आठवडे बाजार, इदगाह मैदान, प्रमुख चौक व गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
    लोकांमध्ये मतदान करण्याबाबत आता बऱ्यापैकी जनजागृती झाल्याचे दिसत समाज माध्यमावर देखील आता मतदानाबाबतचे संदेश झळकू लागले आहेत.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड