जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
,दि.५ - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी गुरुवारी (दि.५) तहसील कार्यालयाला भेट देऊन लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक उप जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधीक्षक बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, तालुक्यातील आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी पांचाळ यांनी निवडणूक विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा देणे यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.निवडणुकीची कामे जबाबदारीने व कर्तव्यदक्षपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार चिंतामण मिरासे,भालेराव,श्रीमती पुपलवाड,डी कुलकर्णी यांच्यासह निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी वाटूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करण्यात आली.