अवैध वाळू वाहतूक करणारऱ्या लिलाव धारकावर कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



तळणी ( प्रतिनिधी ) रवी पाटिल 
   पूर्णा नदी पात्रातून अवैध रित्या वाळू वाहतुक करणार्या दोन हायवावर .स्थानिक गुन्हे शाखा व मंठा पोलीसांनी कारवाई करुन .८१ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करून ठेकेदार हायवाचालकासह राजेभाऊ तांबे याच्यावर ३७९ / ३४ कलम नुसार मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई शनिवारी रात्रीच्या वेळेस लोणार मंठा रोडवर सासखेडा गावानजीक ही कारवाई करण्यात आली . या दोन हायवामध्ये वीस ब्रास अवैध वाळू आढळून आली .सद्यस्थितीत तळणी परीसरात शासनाच्या डेपोवर सर्वसामान्याला वाळू मिळेना झाली अनेकांची कामे वाळू अभावी खोळंबंली असून ठेकेदार स्वःत अवैध विक्री करत असेल तर सर्वसामान्याला वाळू मिळणार कधी लिलाव धारकावर गुन्हा दाखल होण्याची घटना प्रथमच घडली आहे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू उत्खनन करणार्यावर पण लक्ष द्यावे अशी मागणी पूढे येत आहे या प्रकरणाचा तपास तळणी बीट चे रखमाजी मुंढे याच्याकडे दिला आहे 

पुर्णा नदीकाढच्या तळणी - लोणारकडे तब्बल ३० मिनीटात २० वाळुचे टिप्पर धावतात. हे टिप्पर रायल्टी घेऊन की बिना रॉयल्टी वाहतूक करतात हे कळणार कसं ? याबाबत महसूल कडुन तपासणी कधी होणार ? तपासणी होत नसेल तर नेमकं कसं कळणार ? वाळू डेपो वर नेमकी किती वाहनांची नोंदणी आणि प्रत्यक्षात रस्त्यावरील वाहने धावतात किती ? यात मोठी तफावत आहे ? महसूल व पोलीस चे पथक नेमके कुठे आहे ? यांसह अन्य प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत यांची उत्तरं अधिकारी -कर्मचारी देणार ? हाही प्रश्न अनुत्तरित आहे

पुर्णा नदीकाढच्या तळणी - लोणारकडे तब्बल १० मिनीटात २० वाळुचे टिप्पर धावतात . हे टिप्पर रॉयल्टी घेऊन की बिना रॉयल्टी वाहतूक करतात हे कळणार कसं ? जुन्या रॉयल्टीवर कॅम्पुटर मध्ये वेळ आणि तारीख बदलून सर्रास वाळू चोरी सुरु ? महसूलकडुन तपासणी कधी व कुठं होणार ? तपासणी होत नसेल तर नेमकं कसं कळणार ? वाळू डेपो वर आँनलाईन स्टॉक नाही ? नेमकी किती वाहनांची नोंदणी आणि प्रत्यक्षात रस्त्यावरील वाहने धावतात किती ? यात मोठी तफावत आहे ? महसूल व पोलीस चे तपासणी पथक नेमके कुठे आहे ? वाळू वाहतुकीच्या वाहनांना जीपीआरएस प्रणाली कुठं ? वाहनांवर नंबर गायब ? यांसह अन्य प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत यांची उत्तरं महसूल अधिकारी -कर्मचारी देणार ? हाही प्रश्न अनुत्तरित आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व मंठा पोलीस याच्यां पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान महसुलच्या पथकातील कर्मचारी हजर नव्हते अशी माहीती तळणी पोलीस प्रशासनाच बीट प्रमुख रखमाजी मुंढे यांनी सांगीतले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले