परतूर शहरातील मलंग शाह चौक ते अंबा रोड दरम्यानचे अतिक्रमणावर हातोडा

  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी अंबा व इतर ग्रामीण भागातील नागरिकांनी परतुर शहरात प्रवेश करताना आणि मलंग शाह चौकातील झालेल्या अतिक्रमणामुळे झालेली अडचण  प्रशासनासमोर मांडली आणि योग्य कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार करण्याचा इशारा दिला होता
   याची गांभीर्याने दखल घेत नगरपालिका प्रशासनाने आज रोजी या रस्त्यावरील सर्व हातगाडे पान टपऱ्या रस्त्यावर साचलेले लोकांचे बांधकाम साहित्य सर्व हटवण्यात येऊन रस्ता मोकळा केला या कार्यवाहीमुळे मलंग शहा चौकाने आणि तेथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला सदर कार्यवाही माननीय मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली या कामी नगरपरिषद कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे अनिल पारीख,काशिनाथ जाधव ,सुदाम खंदारे,अशोक पावर इत्यादी स्वच्छता कर्मचारी यांनी पार पाडली

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड