परतूर तालुक्यात ३५ हजार संकल्प पत्रांचे वाटप


 मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक विभाग सरसावला 

परतूर, प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
दि.५ - लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभाग सक्रिय झाला असून आतापर्यंत तालुक्यात ३५ हजार संकल्प पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
    परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या परतूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाच्या वतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणूकीचे कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी विविध कक्षांची स्थापना आली आहे.
   निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. यातच स्विप अंतर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व सांगितले जात आहे.तालुक्यातील विविध शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना मतदानाबाबत जागृती करणारे संकल्प पत्रक पाठविण्यात आले आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
  गंज शाळेत स्वीप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदान जनजागृतीसाठी गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे,गट समन्वयक कल्याणराव बागल, मुख्याध्यापक विष्णू तोटे,राम सोळंके, शिक्षक, शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून ते भरून पालकांना मतदानाविषयी माहिती सांगून मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा असा संदेश विद्यार्थ्यांसमोर गटशिक्षणाधिकारी साबळे यांनी दिला.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश