किर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांचे 110 व्या वर्षी निधन

जिल्हा  प्रतिनिधी समाधान खरात

घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील सुप्रसिध्द कीर्तनकेसरी भारतीदास हभप साहेबराव आश्रोबा साबळे (कोठाळकर) महाराज यांचे वयाच्या 110 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि २६ जुन २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्या पाश्चात्य तिन मुले, तिन मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्यावर दि २७ जुन रोजी सकाळी दहा वाजता मूळ गावी कोठाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
       कीर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ग्रामीण शहरी भागात समाज प्रबोधन केले. संतांचे विचार आपल्या शब्दात मांडून समाज घडविण्याचे कार्य केले आहे. कीर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांच्या निधनाने संप्रदायात शोककळा पसरली आहे. जालना येथील प्रयाग हॉस्पिटलचे डॉ.रामेश्वर साबळे यांचे ते वडील होत.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले