नगर परिषद परतुरच्या 45 रोजंदारी कामगारांच्या सेवेत समावेशनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. , शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
नगर परिषद परतुर येथे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात जवळपास तीस वर्षापासून रोजंदारी वर काम करणार्या मजुरांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचे विविध धोरण येऊन देखील सेवेत समावेशन होऊ शकले नाही.
हताश होऊन या कर्मचाऱ्यांनी उपोषण, आंदोलन करूनही या लोकांना कोणी न्याय दिला नाही.
वर्ष 2022 मधे मा. एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्या नंतर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी या रोजंदारी करणार्यांपैकी काही प्रतिनिधींना घेऊन थेट वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री साहेबांसमोर या कर्मचाऱ्यांना सर्व पुराव्यासह घेऊन गेल्यानंतर नोव्हेंबर 2022 मधे मा. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी फेर तपासणी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर विविध स्तरावरून सर्व बाबींच्या तपासणीअंती या 45 दुर्लक्षित रोजंदारी कर्मचार्यांना शासनाचे धोरणात्मक निर्णयाचा लाभ होऊन सेवेत समावेश होण्याच्या अनुषंगाने शासनाच्या अवर सचिव यानी जा. क्र. 365/नवि17 दि. 18 जून 2024 रोजी आयुक्त तथा संचालक मुंबई आणि विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
जिल्हाप्रमुख अग्रवाल यानी या गोरगरिबांना त्यांचा हक्क मिळावा म्हणुन दोन वर्षांपासून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करीत अथक परिश्रम घेतले.