स्वाभिमानी पक्षाची मराठवाड्यातील विधानसभेची पहिली उमेदवारी घोषित
जालना / प्रतिनिधी : समाधान खरात
येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या उमेदवारांची घोषणा आज जालना येथे कार्यकारणी बैठकीत करण्यात आली.भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ५० पेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार रोजी जालना येथे संपन्न झाली. याबैठकीत मराठवाड्यातील पहिल्या उमेदवाराची घोषणा आज जालन्यातून करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक जालना येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा. या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान एक जुलैपासून राज्यभर राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे.
तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवण्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच बारामती येथील राज्य कार्यकारणी बैठकीत केली आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा जिल्हा कार्यकारणी बैठकीत करण्यात आली.भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब स्वाभिमानीच्या संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती.
या जिल्हा कार्यकारणी बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ,राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी भोसले, विधानसभा उमेदवार मयूर बोर्डे, काकासाहेब साबळे,तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे, गणेश राजबिंडे,सुभाष भोपळे,प्रदीप नरवाडे,शरद पंडित,राजू बनकर,समाधान गाढवे,किशोर पंडित,बाबासाहेब दखणे,भारत उंडे, सुनिल कवडे आदींची उपस्थिती होती.
भोकरदन विधानसभेचे उमेदवार मयूर बोर्डे यांच्या विजयाचा संकल्प करून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.