कत्तली साठी आणलेल्या जनावराना परतूर पोलिसांन मुळे मिळाले जीवदान.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आज रोजी सकाळी पहाटे पोलिस स्टेशन परतूर येथील पोलिसांनी गवभागत तसेच कुरेशी मोहल्ला, लड्डा कॉलनी येथे कमिंग ऑपरेशन घेऊन गोवंश ची कत्तल होणार नाही या साठी मोठी कारवाई केली आहे, सर्वांचे घर झडती घेवुन पाहणी केली असता इसम नामे मुजीब जीलानी कुरेशी यांचे घरी कत्तली साठी आणलेले गोवंश जनावरे (वासरे) 43,000/-₹ ची मिळून आल्याने ती पोलिसाने ताब्यात घेऊन पुढील आदेश पर्यंत नगर पालिका परतूर यांचे ताब्यात कोंडवाडा येथे देऊन जनावरांचा कत्तल होनेपासून जीव वाचवला आहे, या कारवाई मुले परतूर पोलिसांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
--- परतूर शहर किंवा परिसरात कोणीही जनावराची अवैध वाहतूक किंवा कत्तल करताना मिळून आल्यास त्यांची गय करणार नाही. आणि असे कोणीही मिळून आल्यास 2 वर्षासाठी त्यांना हद्दपार करण्यात येणार आहे. अशी माहिती पो. निरीक्षक, एम. टी. सुरवसे यांनी दिली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अजयकुमार बन्सल साहेब, पोलिस अधीक्षक जालना, मा.श्री. आयूष नोपणी साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. सुरेश बुधवंत sdpo परतूर यांचे मार्गदर्शनाखाली
एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, विठ्ठल केंद्रे, पो. उप. निरिक्षक परतूर, पोहका/हावले, पोना/ गाडवे, पोका/ आढे, पोका/चव्हाण, पोका / जाधव, पोका/सतिश जाधव, पोका/ पवार, पोका/राठोड, पोका/ गायकवाड, मपोका/धडे, चालक पोहेका/ धोत्रे, यांनी केली आहे.