आषाढी एकादशी निमित्त विवेकानंद शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दिंडीचे आयोजन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर येथील विवेकानंद शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहामध्ये लहान मुलांना आनंद देणाऱ्या वारीचे मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले होते.
विवेकानंद शाळेपासून जवळ असलेल्या श्री विठ्ठलाचे मंदिरा पर्यंत विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यानी लहान मोठ्या वारकऱ्यांसोबत पावली खेळत श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. सोबतच शाळेमध्ये विठ्ठलाच्या भजनावर सुंदर पावल्या खेळत मुलांनी आनंद घेतला. या वेळी शिक्षक यांनी देखील फुगडी, पावली खेळण्याचा आनंद घेत वारीचा अनुभव घेतला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस. जी.बाहेकर मुख्याध्यापिका संगीता शिंदे मॅडम उपस्थित होत्या.दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सुनील खरात बबन बोनगे श्रीपाद तरासे संतोष टेकाळे रमेश घनवट गजानन वायाळ संदीप पाटील राधेश्याम वाघमारे विजय राठोड कुंडलिक बोनगे सावता माने मोरे सर डुकरे मॅडम टेकाळे मॅडम इंजे मॅडम कवले मॅडम व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
जय हरी🚩