ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील - भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर,लिंबोना ता. मंठा येथे १५ लक्ष रुपयांच्या वसंतराव नाईक सामाजिक सभागृहाचे राहुल लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन
मंठा प्रतिनिधी रवी पाटील
माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मंठा परतूर नेर सेवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव वाडी वस्ती तांब्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून आमदार लोणीकरांच्या माध्यमातून अनेक गावांचा कायापालट झाला आहे लोणीकर कुटुंबीयांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही करणारही नाही परंतु अनेक लोक केवळ जातीपातीचे राजकारण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्यक्षात गावाच्या विकासासाठी ज्या समाजाच्या नावावर मते घेतात त्या समाजाच्या विकासासाठी कुठलीही ठोस भूमिका कधी घेत नाहीत किंवा कुठलेही काम सामाजिक भावनेच्या उद्देशाने करत नाहीत त्यामुळे अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव श्री राहुल लोणीकर यांनी आज केले
मंठा तालुक्यातील लिंबोना येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत वसंतराव नाईक सामाजिक सभागृह भूमिपूजन (१५ लक्ष रु) कार्यक्रम प्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर माजी संचालक विठ्ठलराव काळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास घोडके, भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष कैलास चव्हाण, सरपंच परिषदेचे मंठा तालुका अध्यक्ष आनंद जाधव, माळकिनीचे सरपंच जगदीश जाधव, माऊली गोंडगे, सावरगाव वायाळ चे सरपंच सोपानराव वायाळ, रमेश वायाळ, लिंबोना गावचे सरपंच रामेश्वर इंगळे, उपसरपंच भरत राठोड, बाळासाहेब इंगळे, जानकिराम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी पुढे बोलताना श्री राहुल लोणीकर म्हणाले की प्रत्येक गाव वाडी वस्ती तांड्याच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर सातत्याने प्रयत्नशील असतात प्रत्येक गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून परतुर व मंठा तालुक्यासाठी वॉटर ग्रीड सारखी महत्त्वपूर्ण योजना मंजूर करण्यात आली आहे त्या योजनेच्या माध्यमातून लवकरच उर्वरित गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे आमदार लोणीकरांच्या कार्यकाळात प्रत्येक गाव वाडी वस्ती तांड्याला डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याने जोडण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक गावाला दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असेही यावेळी राहुल लोणीकर म्हणाले
सर्वसामान्य जनतेचा विजेचा प्रश्न सुटावा यासाठी आमदार लोणीकरांच्या माध्यमातून विजेचे जाळे निर्माण करण्यात आले आहे आता प्रत्येक गावामध्ये कृषी पंपाची वीज वेगळी व गावठाणची वीज वेगळी अशा प्रकारची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक गावाला स्वतंत्र ट्रांसफार्मर मिळणार आहे शेतीसाठी व घरगुती वापरासाठी मुबलक वीज मिळावी यासाठी आमदार लोणीकर सातत्याने प्रयत्नशील असतात लिंबोना गावासाठी देखील एक १०० चा ट्रांसफार्मर मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी उपस्थित नागरिकांना दिला
आपल्या गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवत सर्व जाती धर्मांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लोणीकरांच्या पाठीशी उभे राहावे अशी विनंती देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी केली यावेळी उद्धवराव इंगळे, दत्तराव खराबे, बाबासाहेब राठोड, सरपंच रामेश्वर इंगळे, उपसरपंच भरत राठोड, शिवाजीराव भोसले, नारायण इंगळे, बाबासाहेब राठोड, भिका चव्हाण, जानकीराम राठोड, विश्वनाथ राठोड, विष्णू राठोड, अशोक राठोड, राजू सिताराम चव्हाण, भारत चव्हाण, अशोक काटकर, सचिन पवार, अश्रूबा इंगळे, आबासाहेब इंगळे, गुलाबराव राठोड, रामेश्वर राठोड, महादेव राठोड, संतोष राठोड, शरद चव्हाण, राजू वसाराम राठोड यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते