सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विकासकुमार बागडी यांची व्हाईस ऑफ मिडीयाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड


जालना  प्रतिनिधी समाधान खरात 
  व्हाईस ऑफ मिडियाच्या साप्ताहिक विंगसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीमध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि पत्रकारांनी मतदान केले असून सदर निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून रोहित जाधव (सांगली), प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून अब्दुल कयुम (छत्रपती संभाजीनगर), सरचिटणीस वामन पाठक (लातूर) तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जालन्याचे पत्रकार विकासकुमार बागडी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सदर निवडणूक व्हाईस ऑफ मिडियाचे संदीप काळे यांच्या संकल्पनेनुसार मार्गदर्शक ठरली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. संजीवकुमार कलकोरी व राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोडकर यांनी काम पाहिले. निवडणूक यशस्वीतेसाठी प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, विजय चोरडिया, विनोद बोरे, दिव्या पाटील,गणेश शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.
या निवडीबद्दल विकासकुमार बागडी यांचे व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे,  राजेश भालेराव, बाबासाहेब कोलते, रवि दानम, कैलास फुलारी, अहेमद नूर,  गोविंदप्रसाद मुंदडा, लियाकत अली खान, आकाश मुंदडा, साहिल पाटील, अंकुश देशमुख, लक्ष्मण राऊत, मकरंद जहागिरदार, अशोक मिश्रा, सुनिल खरात, लाव्ह्यू निर्मल, शेख महेजबीन, सय्यद मुश्ताक, अश्पाक पटेल, अजिम खान आदींनी अभिनंदन केले आहे.
----
मुख्यमंत्र्यांसमोर पत्रकारांनी समस्या मांडाव्यात-बागडी
31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे राज्यव्यापी अधिवेशन होत असून या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यासाठी जिल्ह्याचे सर्व साप्ताहिकचे संपादक व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत