श्री समर्थ विद्यालय पाटोदा माव व श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे वृक्षारोपण.

  परतुर प्रतिनिधी : कैलाश चव्हाण 
   परतुर तालुक्यातील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय     पाटोदा माव व स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जुलै रोजी पाटोदा येथील गणपती देवस्थान समोर मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यात वड, पिंपळ, लिंब, करंजी, व चिंच आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. आणि त्या झाडांना काटेरी कुंपण सुद्धा करण्यात आले ,या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश पाटोदकर सर, स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथील एन.एन.एस विभाग प्रमुख प्रा.काळे सर ,प्रा.पांडूरंग नवल सर , प्रा.उढाण सर यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
      यावेळी मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर,एन.एन.एस प्रमुख प्रा.काळे सर,प्रा.पांडूरंग नवल व प्रा.उढाण सर यांनी वृक्षरोपणाचे महत्व विशद केले.
      कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड