परतूर सकल मातंग समाजाच्या वतीने अविनाश खंडागळेला श्रद्धांजली अर्पण...
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दिनांक १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय देत sc/st प्रवर्गात वर्गीकरण करण्यास मान्यता दिली होती या अनुषंगाने राज्य शासनाने तात्काळ राज्यात आरक्षण वर्गीकरण लागू करायला हवे होते परंतु शासनाच्या आणि विरोधी पक्षांच्या उदासीन धोरणामुळे आरक्षण वर्गीकरनास विलंब लागत आहे या कारणाने दिनांक २५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील अविनाश खडांगळे या तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील परतूर सकल मातंग समाजाच्या वतीने अविनाश खंडागळे शहीदास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अखिल भारतीय मातंग संघ तालुका अध्यक्ष
इंद्रजित हिवाळे यांनी शोक व्यक्त करीत बोलतांना म्हंटले की,गेल्या अनेक दाशका पासून मातंग समाजाचा आरक्षण वर्गीकरनाचा प्रश्न प्रलंबित असून याकरीता लोकशाहीच्या माध्यमातून समाजाने राज्यभर शांततेच्या मार्गाने महामोर्चे काढले, विविध मार्गाने आंदोलने केली.वर्गीकरन
आरक्षणाची रास्त मागणी मान्य न करता केवळ चालढकल करण्याची सरकारची आणि विरोधी पक्षांची भूमिका चालू आहे आता ही खेळी आम्ही आता चालू देणार नाही,संयमाचा अंत या सरकारने आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पाहू नये, आरक्षण वर्गीकरन युवकांच्या मनातील हुंकार आहे, एक अंगार आहे. आता या मागण्या मान्य होईपर्यंत समाजातील युवक मरणार नाही तर लढणार आहेत तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नका आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने लढा जिंकायचा आहे आणि तो आपण जिंकणारच आहोत.
शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ आमालबजावणी करून आयोग गठित करून sc/st प्रवर्गाचे वर्गीकरण करून अतीवंचित उपेक्षित जातींना न्याय द्यावा.अशी भावना इंद्रजित हिवाळे यांनी व्यक्त केली याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती परतूर चे संचालक विजय वाणी श्रावण मालक हिवाळे अश्रुबा गायकवाड बाबासाहेब हिवाळे दगडू मामा संतोष सुतार घोडे शेषराव हिवाळे अरुण सदावर्ते दत्ता हिवाळे अनिल हिवाळे प्रदीप फुलमाळी अशोक काळे गजानन कापसे सुरेश गव्हारे अनिल थोरात विकास धोत्रे रामा हिवाळे अशोक काळे नरेश हिवाळे व अन्य समाज बांधव उपस्थित होते