जालना स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई;टिपकराज बार मधील चोरी प्रकरणी गुन्हेगार जेरबंद

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
 जालना शहरातील स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील दीपक राज बारमध्ये चोरी करणारा परभणी येथील  सराईत आरोपीस जेरबंद करून 60,262/- किमतीचा मुद्देमाल केला जप्त....
      सिंदखेडराजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दीपक राज बार मध्ये दिनांक 16 अगस्त रोजी विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या रात्री दोन वाजता सुमारास चोरी गेल्याची  घटना घडली, हॉटेल बारचे मालक यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे चोरीची फिर्याद दिली कलम 305 (A),334(1) भारतीय न्याय संहिता अन्वये  अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता 
    सदरील गुन्ह्याचा तपासा बाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक  गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरच्या गुन्ह्या बाबात  सूचना देवून मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने दिनांक 24 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व आमलदार यांनी  सदरील  गुन्ह्या बाबत  आरोपी शेरूसिंग सोजितसिंग भोंड वय 22 वर्ष याला परभणी येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून रुपये 60,265/- किमतीच्या विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा  यांनी कळवीले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाली, उपविभागीय पोलीस अधिकारी  अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे,सपोनि शांतीलाल चव्हाण,  पोउपनि राजेंद्र वाघ,  सोबत  पोलीस अंमलदार कांबळे ,कृष्णा तंगे, रामप्रसाद पव्हरे, सुधीर वाघमारे, कैलास खाडे, भाऊराव गायके,  लक्ष्मीकांत आडेप, जगदीश बावने, जैवाल,  बाविस्कर, इरशाद पटेल, चिचोले,  मुळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली..

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात