न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी निवड.


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य आयोजीत  राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आट्या-पाट्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज परतूर संघाची विभागीय स्तरावर निवड झाली.
झालेल्या निवडी बद्दल संस्थे तर्फे विद्यार्थी व क्रिडा शिक्षक विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
सत्करा प्रसंगी कार्याध्यक्ष म्हणाले की, आपली कामगिरी  पाहून आम्हा सर्वांना आपला खुप अभिमान वाटत आहे अशीच कामगिरी करत आपण प्रत्येक यशाचे शिखर गाठीत जावे व आपणास पुढील वाटचालीस शभेच्छा.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कर्याध्यक्ष गणेश सोळंके, संस्था सचिव छाया बागल, मुख्याध्यापक साम वर्गीस, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड