शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी १०० जागेची मान्यता
     जालना, दि.३०(नरेश अन्ना):- शासनाकडून जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता १०० जागेची मान्यता देण्यात आली आहे.  
  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा, बांधकाम आदीची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.  तरी जालना जिल्ह्यातील सर्वांसाठी आरोग्य सेवेतील महत्वाची  बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment