८ ऑक्टोबरला मॉडेल कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय ‘आविष्कार’चे आयोजन
जालना प्रतिनिधी समाधान खरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार अधिवेशनाचे आयोजन दि.८ ऑक्टोबर रोजी मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा आणि क्षमतांचा आविष्कार व्हावा, त्यांच्यामध्ये संशोधन जाणिवा विकसित होऊन त्यांना अधिछात्रवृत्तीच्या स्वरूपात बळ मिळावे यासाठी राजभवनद्वारे २००६ पासून ‘आविष्कार’ या आंतरविद्यापीठीय संशोधन व नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
यावर्षीचा राज्यस्तरीय ‘आविष्कार’ डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जानेवारी २०२५ मध्ये संपन्न होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून कुलगुरू प्रा. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय आविष्कार अधिवेशनाचे आयोजन करून त्यानंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार संपन्न होणार आहे.
शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील संशोधन कल्पकता व नवोपक्रमांना अधिकाधिक चालना मिळावी, ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी यावर्षीचा आविष्कार प्रथमत: जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे यासाठी नोंदणी दि. १६ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर पर्यंत राहणार आहे
याचे गट खालील प्रमाणे असतील
ज्ञानशाखानिहाय सहा गट : पहिला गट - मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला, दुसरा गट - वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, तिसरा गट- विज्ञान, चौथा गट- कृषी व पशुसंवर्धन, पाचवा गट - अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि सहावा गट - औषधनिर्माणशास्त्र यांचा समावेश
संशोधक विद्यार्थ्यांचे तीन स्तर :
पदवी (युजी), पदव्युत्तर पदवी (पीजी) आणि पदव्युत्तर पदवीनंतरची पदवी (पोस्ट पीजी)
वयोमर्यादा :
पदवी- वय वर्ष २५, पदव्युत्तर पदवी- ३० आणि पोस्ट पीजीकरिता वयोमर्यादा नाही या सर्धा करीता जिल्हा समन्वयक : प्रा. पुरुषोत्तम देशमुख, प्रा. रमेश चौंडेकर
मुख्य संयोजन समिती :
समन्वयक डॉ. भास्कर साठे, प्रा.बी.एन.डोळे, प्रा. प्रवीण यन्नावार, प्रा.शशांक सोनवणे, प्रा.पुरुषोत्तम देशमुख, प्रा.आनंद देशमुख, डॉ.सचिन भुसारी, डॉ.सतीश भालशंकर, डॉ.सुहास पाठक, प्रा.राम कलाणी, डॉ.माधुरी सावंत, डॉ. स्मिता साबळे,
प्रमुख मार्गदर्शक :
कुलगुरू प्रा.विजय फुलारी, विशेष सहकार्य - प्र-कुलगुरू प्रा.वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर
स्थळ : मॉडेल कॉलेज, घनसावंगी
अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे व आविष्कारचे समन्वयक डॉ. भास्कर साठे, आयोजक प्राचार्य डॉ. रामराव चव्हाण, प्रा. संदीप पाटील यांनी दिली