परतूरचे पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांना बंधू शोक
परतूर प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांचे जेष्ठ बंधू गोरख तुकाराम सुरवसे यांचे दि 26 सप्टेंबर 2024 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बीड जिल्ह्यातील चाकरवाडी त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 62 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुले, एक मुलगी,भावजई, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.