देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   दिनांक 5 सप्टेंबर 2024 वार गुरुवार रोजी परतूर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री चक्रधर स्वामी यांची जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य जयकुमार तीमोथी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक ,व शिपाई या भूमिका निभावून आजच्या दिनी शाळेचे कामकाज चालवले. 
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेचे संचालक सुबोध  चव्हाण यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड व भेट वस्तू देण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेचे संचालक श्री सुबोध  चव्हाण यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची सहशिक्षक श्री गजानन कुकडे यांनी केले. यावेळी शाळेचे संचालक  संतोष चव्हाण,  सुबोध  चव्हाण, शाळेच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य जयकुमार तीमोथी, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रदीप चव्हाण,  राजेश कार्लेकर, सहशिक्षक  गजानन कुकडे, रमेश कदम, शाहीर मुजावर, प्रदीप साळवे,  विजय भापकर वंदना ककरीये, स्वाती काळे,मीनाक्षी भाग्यवंत, त्रिवेणी गिरी, निकिता कदम, शिबा काजी, श्वेता पाठक, अश्विनी डोंबाळे, मनीषा लहाने, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड