विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024,परवाना धारकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध;शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत


 

 जालना प्रतीनीधी नरेश अन्ना श्रीपत

 भारत निवडणुक आयोगाच्या सुचनानुसार जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024  चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन निवडणुक घोषित झाल्यापासुन निवडणुक निकाल घोषित होईपर्यत, परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तरी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्ञास्ञे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.  शस्ञ परवानाधारकांनी आपले शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्याचे आत संबधितांचे शस्ञे परत करण्यात यावेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....