परतूर येथे त्यागमूर्ती माता रमाईची जयंती उत्साहात केली साजरी
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि.७ फेब्रुवारी रोजी परतूर येथे बहुजनांची आई त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त ठीक सकाळी ठीक १० वाजता तहसील कार्यालयाच्या समोर पुतळ्याच्या नियोजित जागेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.त्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नंतर जयंती समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ,त्यानंतर बोधाचार्य हेमंत पहाडे यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका व आंबेडकरी अनुयायांना बुद्ध वंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली, नंतर उपस्थित मान्यवरांचे जनसमुदायाला मार्गदर्शन मिळाले, या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शहाजी राक्षे, शिवाजी पाईकराव, रमेश पाईकराव, अँड.महेंद्रकुमार वेडेकर, इज्रान भाई कुरेशी, ढवळे साहेब, उपस्थित होते.
यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत वाकळे, सचिव स्वप्निल पहाडे,प्रदीप साळवे, पत्रकार प्रभाकर प्रधान, पत्रकार अशोक ठोके,सनी गायकवाड, दीपक हिवाळे,पत्रकार राज भदर्गे, अविनाश पाडेवार, राहुल पहाडे, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर यांनी केले होते. संध्याकाळी ठीक सहा वाजता माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीची सुरूवात रेल्वे स्टेशन येथील संविधान चौकातून पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, वंचितचे नेते रामप्रसाद थोरात, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार, युवा नेते नितीन जेथलिया, वंचित बहुजन आघाडीचेजिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे,तालुकाध्यक्ष रवींद्र भदर्गे,शहाजी राक्षे व शिवाजी पाईकराव यांच्या हस्ते माता रमाईच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सजलेल्या रथामध्ये माता रमाई यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या आकर्षक अशा रथातून माता रामाईची मिरवणूक निघाली होती. परतूर येथे माता रमाई जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, आंबेडकर प्रेमी सहभागी झाले होते,या मध्ये महिलांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषनेने संपूर्ण परतूर शहर दणाणून गेले होते. मिरवणुकीचा समारोप आंबेडकर नगरमध्ये रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत वाकळे, सचिव स्वप्निल पहाडे, राहुल नाटकर, प्रदीप साळवे, सनी गायकवाड, मारी साळवे,विलास पाडेवार, रवींद्र इंगळे,दीपक भदर्ग, राहुल पहाडे,कुमार लांडगे, धम्मपाल खंडागळे, गुलाब दंवडे, अजय पाडेवार, भीमा जाधव, तुषार पहाडे, प्रकाश पाडेवार, लखण पहाडे, सचिन सोनपसारे , रुपेश पहाडे आदींनी परिश्रम घेतले. मिरवणुकीचा समारोप आंबेडकर नगर येथे करण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, मुंढे साहेब, विजय जाधव, पवार साहेब, खाडे साहेब, शिंदे साहेब व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.