तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थजेणेकरून केला पुरुषार्थ - हभप अर्जून महाराज बदाड
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
तळणी येथून जवळच असलेल्या कानडी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आज श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बीजे निमित्त ह भ प अर्जुन महाराज बादाड यांची सेवा संपन्न झाली तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थजेणेकरून केला पुरुषार्थ या अभंगावर महाराजांनी सुंदर चिंतन केले जगद्गुरु तुकोबारायांची साधना त्या साधनेच्या आधारावरच वैकुंठाची प्राप्ती करणारे तुकोबारायांच्या या बीज उत्सवाची आज संपूर्ण भारतामध्ये संपन्नता होत आहे जगद्गुरु तुकोबाराय त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण होय स्वतःच्या संसारीक आयुष्यावर पाणी टाकून सर्वसामान्यांसाठी जो गाथा दिला तू आपल्यासाठी जीवन ग्रंथ असून त्याचे आचरण प्रत्येकाने करणे या कलियुगात गरजेचे आहे माऊली ज्ञानोबाराया असतील जगद्गुरु तुकोबाराया असतील श्री संत एकनाथ महाराज असते व अनेक संत वाङ्मयातील संत असते यांचे वाङ्मय आपल्यासाठी एक आदर्श आहे आपल्याला जीवनाची प्रेरणा देणारे हे ग्रंथ आपल्यासाठी अमृततुल्य आहे त्याचे रस पान मनुष्याने जर केले तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आज साडेतीनशे वर्षे होऊन सुद्धा गाथा व ज्ञानेश्वरी आजारावर आहे सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ते आजरावर राहतील .झोप आता जी ज्ञानेश्वरी जे एकनाथी भागवत आपल्याला समजेल अशा भाषेत या संतांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे .असे प्रतिपादन हभप अर्जुन महाराज बादाड यांनी कानडी येथे केले
जीवनात मनुष्याने एक तरी पुरुषार्थ केला पाहिजे किंवा तो जिंकला पाहिजे यामध्ये धर्म अर्थ काम व मोक्ष यापैकी एक तरी संसारिकांना जिंकता आला पाहिजे हे चारही गुण तुकोबारायणी जिंकले होते म्हणून त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हटले जाते
त्या काळात जगदगुरू तुकाराम महाराज यांचा गाथा इंद्रायणी टाकल्या गेला आणि तेरा दिवसच का पाण्यात राहिला याचं कारण तेरा दिवस गाथा भिजला नाही अन तेरा दिवस पाण्यात राहिला याचं कारण इंद्रायणी मातेने सुद्धा तेरा दिवस गाठ् गाथा पारायण केले म्हणून तेरा दिवस इंद्रायणी मातेने तो गाथा सांभाळला देहू मध्ये जशाला तशा कोरडी कागद बाहेर निघाले . साक्षात भगवान विष्णूचा अवतार असलेले तुकोबांच्या अध्यात्मीक व द्रढ साधनेच्या ओझे सुद्धा पांडुरंगाला होते . विष्णू परमात्म्याचे रूप होते मनून . सुरवातीला रामेश्वर भट्टाचार्य यांनी तुंकोबाना केलेला विरोध फार काही करू शकला नाही रामेश्वर भट्टाचार्य यांचाही अधिकार मोठा होता .
देवाकडे जे सामर्थ होते तेच सामर्थ्य तुकोबाराय मध्ये सुद्धा होते तुकोबारायाचं सामर्थ्य पांडुरंग पेक्षा एक काकण शिल्लकच होते देवा पेक्षा तुकोबारायाचा सामर्थ्य थोडं शिल्लक आहे देवान तरी जिवंत बैलाचे दूध काढले परतू तुकोबारायांनी मृत नदीचे काढले आहे . तुकोबाराय हे साधू अगदी 42 वर्षाचा जीवन जगले कारण या कलियुगाचा नियम आहे कलियुगात जास्त दिवस जगायचं तुम्ही ग्रंथ वाचा श्रीमद् भागवत सांगते कधी युगामध्ये जास्त दिवस जगायचं नाही का नाही तर कलियुगामध्ये स्वामी विवेकानंद लवकर गेले म्हणून तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज जास्त दिवस राहिले नाही तुकोबारा 42 वर्ष राहिले पण शेवटी तुकोबारायांना या समाजाला अगदी त्यांना वाटलं की आपलं कार्य संपलं जगाला गाथा दिला जगाची जगतगुरु झाले आणि आपलं कार्य संपलं आणि उद्या वैकुंठाला जायचं म्हणून आज तुकोबाराय सर्व गावात फिरले सर्व गावात उद्या आम्ही वैकुंठाला जाणार आहे कोणाला माझ्यासोबत यायचं असेल तर तयारीला लागा पण लोकच महाराज .आज दुपारी बरोबर येथून माग 375 वर्षे झाले आजच्या तिथीला तुकोबारा भगवंताचा धावा करू लागल्या डोळ्यात पाणी होतं आणि तुकोबारात वैकुंठाला कसे जातात हे पाहण्याकरता सर्व देहूगाव जमलेले सर्व देहूगाव जाता जाता म्हणत होते अरे चला माझ्यासोबत आमचं तुमच्या सोबत येण्याचा आमचा अधिकार नाही आम्ही तुमचे गुणगान गाऊन तुम्ही माझ्यासोबत जरी येत नसता सुद्धा मी भाग्यवान म्हणायला लावील भाग्यवान म्हणेल कारण की तुकोबाराय काय झाले डोळ्याने पाहिले आणि बरोबर भगवान न्यायला आले आणि सर्व देहू गाव पाहत होत आणि बरोबर बारा वाजता श्री तुकोबाराय आपला पहिला पाय सदैव वैकुंठ गमनासाठी वैकुंठ पहिला पाय ठेवल्यानंतर काळाला वाटलं सोडून जातील आणि तुकोबाराय मला भेटेल पण तुकोबारायांनी कळाला खाली बसवलं आणि दुसरा पाय काळाच्या डोक्यावर ठेवला आणि देवाने पाठवलेल्या विमानात मार्गस्त झाले जगदगुरू तुकाराम महाराजांकडे असलेले सामर्थ्य सवसामान्य सामर्थ्य नव्हते मनुष्याला मिळालेला हा नरदेह जड आहे निसर्गाच्या नियमानुसार मनुष्याला हा नरदेह याच ठिकाणी सोडून जावे लागते पंरतू जगदगुरु तुकाराम महाराज याला अपवाद होते ते सदैव वैकुठाला गेले म्हणजे निसर्ग नियमाच्या विरुद्ध गेले हा त्यांचा अधिकार वेद हे कोणीही म्हणू शकतो परतू एका पशू च्या तोडून वेद बोलवून घेण्याचा अधिकार हा माऊली चा होता ज्ञानोबा तुकोबा कडे असलेली भक्ती गंगाजळी कधीच कमी झाली नाही .त्यांच्या ठिकाणी असलेला समर्पण भाव देवावर श्रद्धा व आपण केलेल्या साधने स्वहित न पाहिल्याकारणानेच आज त्यांना देवत्व प्राप्त झाले हेच मोठेपण प्रत्येक संतांच्या ठिकाणी असून त्या संतांचा आदर्श आपल्या जीवनात आपण अवश्य घेतला पाहिजे
जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती आपल्यासाठी आदर्श असली पाहिजे श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्यासाठी देव काम करू लागतो यांच्यासाठी देव धावून येतो तेवढी साधना मनुष्याकडून होणार नाही कारण की या कलियुगामध्ये कलीचा असलेला प्रभाव भक्ती साधनेच्या आड येत असला तरीमनुष्याने स्वतःच्या कर्तुत्वावर स्वतःच्या इच्छाशक्तीवर आपली साधना करत रहावी त्या साधनेमध्ये त्या भक्तीमध्ये नियमितताआणावी व आपल्या जीवनाचे साफल्य करून घ्यावे हेच या बीजेच्या दिवशी आपण संकल्प करूया असेही अर्जुन महाराज बादाड यांनी शेवटी सांगितले