लोकसेवा नशामुक्ती केंद्राचे थाटात उद्घाटन , लोकसेवा व्यसनमुक्ती प्रबोधन केंद्र तरुणांना दिशावह .-वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज
साखरखेर्डा प्रतिनिधी - राधेश्याम बंगाळे
माणूस हा सवयीचा गुलाल आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात देशाच्या उज्वल भवितव्याची इमारत उभारणारा युवक व्यसनाधीन झाला असून अशा व्यसनी माणसाला प्रेमाची आणि सुरक्षिततेची आत्यंतिक गरज असते. त्याची त्याच्या जीवनमूल्यांवरची श्रद्धा आणि विश्वास दृढ झाला पाहिजे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला समजावून घेतलं पाहिजे कारण त्याला अशा काळात कुटुंबाच्या
मदतीची जास्त गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तो जिथे आहे, त्या वातावरणात मोकळं वाटलं पाहिजे.
राधेश्याम बंगाळे पाटील यांचा समाजसेवी उपक्रम तरुणांना नशामूक्तिच्या वाटेवर घेऊन जाणार आहे जिल्हातील व्यसनाधीन झालेल्यांना त्यांना त्यातून सुटका करण्याचा वीडा उचलला आहे. लोकसेवा आयुर्वेदिक केंद्रा च्या माध्यमांतून लोकांना आधार बनवून भरकटत चाललेल्या व्यसनाधीन पिढीला प्रबोधनाच्या माध्यमातून दिलासा मिळेल असे प्रतिपादन जगद्गुरू पलसिध्द महास्वामी पिठाचे मठाधिपती वेदान्ताचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
ते काल साखरखेर्डा येथे राधेश्याम बंगाळे पाटील सा.खेर्डा येथे भारत नशामुक्ती व मधुमेह मुक्ती तसेच समर्थ शोषण समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर अंतर्गत आयुर्वेदिक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी आष्टी पिठाचे मठाधिपती विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, लक्ष्मण पुरी गोसावी, सरपंच सुनील जगताप, माजी केंद्र प्रमुख दिलीपराव खंडारे, रवी काटे, संतोष अंभोरे, विशाल निकम, अंकुर देशपांडे, तेजराव बापू देशमुख, रवी मांटे, अनिल महाराज चेके, ज्ञानेश्वर खरात पाटील, अमोल बाजड पाटील, बाबा तिवारी, शिवदास रिंढे अविनाश बंगाळे, आश्रृबा बंगाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी राधेश्याम बंगाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, अध्यात्त्माच्या मार्गावर वळलात तर तुमच्या वाटय़ाला सुखच सुख, यशच यश, लाभच लाभ, मानच मान, अनुकूलताच सतत येईल, असा कोणाही संताचा दावा नाही. पण या मार्गानं प्रामाणिक वाटचाल सुरू असेल, तर हा मार्ग जीवन खऱ्या अर्थानं जगण्याची कला शिकवतो. तो सुखानं, यशानं, लाभानं हुरळू देत नाही की दु:खानं, अपयशानं, हानीनं खचू देत नाही! मान आणि अपमान या दोन्ही परिस्थितींत मनाची समता कशी टिकवायची, याचा वस्तुपाठ तो देतो. अनुकूल परिस्थितीनं तो बेसावध होऊ देत नाही की प्रतिकूल परिस्थितीनं गांगरू देत नाही. रोगादि देहदु:खांकडेही तो धीरानं पाहतो आणि आवश्यक ते उपचार करीत असतानाही मनात बोधाचे संस्कारच जागवतो. काही जणांच्या मनात अध्यात्त्म आणि कर्तव्य, याबाबतही गोंधळ असतो. त्यामुळे तरुणांनी व्यसनाधीनतेच्या मार्गावर न जाता आध्यात्माची कास धरावी यासाठी आपण लोकसेवा प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून गावागावात जाऊन प्रबोधन करणार असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ दिव्या बंगाळे यांनी केले.