मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी


जालना प्रतीनीधी समाधान खरात/नरेश अन्ना
 काद्राबाद येथील दर्गा बेस समोर निजाम कालीन पुर्वीचा शितलामाता मंदिर असून दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दि. 15 मार्च ते 28 मार्चपर्यंत पुजा महोत्सव करण्यात येणार आहे. सदर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि पुजासाठी अग्रवाल, माहेश्वरी, ब्राम्हण, जैन, जाट, गुजर, नाभिक असे पंचवीस ते तीस हजार मारवाडी राजस्थानी समाजातील लोकं सहकुटूंब येणार आहेत. सदर मारवाडी समाजाचे लोकं हमखास रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत जास्त संख्येने पुजाला येत असल्याचे व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात श्री. बागडी यांनी जालना महानगर पालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडीत पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पाणी वेस ते राजमहेल टॉकीज, मुर्तीवेस पर्यंत महानगर पालिकेने अतिक्रमण काढलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिग असून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच शितलामाता मंदिर परिसरात कचरा आणि घाण पसरलेली आहेे. तात्काळ स्वच्छता विभागामार्फत ट्रॅक्टर लावून हा परिसर स्वच्छ करुन देण्यात यावा, मंदिर परिसरातील अनेक पथदिवे बंद असून ते तात्काळ चालू करण्यात यावे व मंदिरासमोर एका अज्ञान व्यक्तीने बेकायेदेशिरपणे मटन दुकान चालू केलेली आहे. ती त्वरीत बंद करण्यात यावी. येणार्‍या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, भाविकांना विनंती करण्यात येते की, सध्या शहरामध्ये गुन्हेगारी वाढली असून दर्शनासाठी येत असतांना दागिने किंवा महाग वस्तू घेऊ नये, तसेच 12 नंतरचे दर्शन टाळून सकाळी 5 ते रात्री 10 असे दिवसभर दर्शन, पुजा करता येईल, अशी विनंतीही श्री. विकासकुमार बागडी, नगरसेवक विष्णू पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी यांनी केली आहे.
      निवेदन देतांना विकासकुमार बागडी यांच्यासह नगरसेवक विष्णू पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी, स्वच्छता विभाग पअमुख पंडीत पवार, लिपीक ऋषी शिडुते आदी दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत