अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  परभणी येथे राहणारी दहा वर्षाची चिमुरडी मुलगी भंगार वेचण्याचे काम करत होती दररोज प्रमाणे ती मुलगी भंगार वेचण्यासाठी गेली होती दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्या बालिकेला दोन नराधमांनी बळजबरीने उचलून नेऊन कॅनल मध्ये तिच्यावर रात्रभर अत्याचार करण्यात आला आणि सकाळी ती मुलगी आली व रात्री घडलेली घटना आईला सांगितली आणि नंतर गौतम नगर येथे राहणारे यशोदीप कनकुटे व श्रवण टेकुळे या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनाने यांनी हा खटला फास्ट कोर्टात चालवावा जेणेकरून महिला व मुलीवर अत्याचार करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रकरण हाताळावे व आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी.
नसता लहू क्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल.
या निवेदनावर लहू क्रांती संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष राजू जी कसबे साहेब,महाराष्ट्र संघटक विठ्ठल नाटकर, युवक प्रदेशाध्यक्ष,अशोक साबळे, जालना जिल्हाध्यक्ष,दत्ता घोडे, साहेबराव गायकवाड जिल्हाध्यक्ष धाराशिव.आनंद भारसाकळे,परतूर तालुका अध्यक्ष, सुखदेव घोडे, परतूर तालुका कार्याध्यक्ष, सतिश थोरात,सुखदेव साठे आदीच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात