सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आयुर्वेद चिकित्सा ही भारताची सर्वात्कृष्ट चिकित्सा . बबनराव लोणीकर


तळणी प्रतिनिधी रवी पाटील
      मंठा तालुक्यातील तळणी येथे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सौ रुपाली रवींद्र देशमुख यांच्या विश्वरूप आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटरचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी परतूर मंठा विधानसभा चे आमदार बबनराव लोणीकर महंत बालक गिरी महाराज श्रीकृष्ण चैतन्य स्वामी निळकंठेश्वर व महंत चरणदास महाराज डाँ रविंद्र देशमुख ह भ प विष्णू महाराज बांदाड यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला 
  यावेळी बोलताना लोणीकर यांनी असे सांगितले की आयुर्वेद चिकित्सा ही भारताची प्राण आहे अनेक साधुसंतांच्या ऋषीमुनींच्या कठीण परिश्रमातून आयुर्वेदाचे नवीन नवीन शोध त्या काळात सुद्धा लावले गेले असल्याने आज त्याच शोधाच्या आधारावर संपूर्ण विश्व हे आयुर्वेदिक चिकित्सालया कडे आशेने बघत आहे भारतातच मोठ्या प्रमाणात या आयुर्वेद चिकित्सा भारतातच होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आयुर्वेदाला जागतिक पटलावर त्याचे महत्त्व वाढण्याचे काम अनादी काळापासून सुरूच आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य स्वतःची दिनचर्या हरवून बसला असून आपली दिनचर्या कशी असावी हे सुद्धा आयुर्वेदाने आपल्याला सांगितले आहे आपल्या पूर्वजांनी सुद्धा आयुर्वेदाचाच वापर करून तंदूरस्त जीवन कसे जगता येईल याचाच विचार केलेला आहे आज-काल आयुर्वेदाला फार प्रसिद्ध जरी नसली तरीसुद्धा येणारा काळा आयुर्वेद चिकित्सला यासाठी सुवर्णकाळ असणार आहेकारण की आयुर्वेदाची औषधी व तिचे उत्पन्न हे संपूर्ण भारतातच मिळत असल्याकारणाने व त्याचे दुष्परिणाम नसल्याकारणाने लोक त्याकडे या पुढील काळात नक्कीच वळतील असा आशावाद त्यांनी या वेळेस व्यक्त केला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व आयुर्वेद या विषयावर काम करण्याची जिद्द एक ग्रामीण भागातील महिला डॉक्टर करते याबद्दलही लोणीकरांनी डॉक्टर रूपाली देशमुख यांचे कौतुक केले

यावेळी डॉक्टर रूपाली देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म या पुढील काळात प्रत्येकाने करणे गरजेचे आहे अनेक छोट्या गोष्टी ज्या आहेत आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित त्याचा विसर पडलेला असला कारणाने आपण आयुर्वेदाकडे वळत नाही परंतु आयुर्वेदिक ही अशी जादू आहे ज्याच्यापासून आपले नुकसान काही नाही परंतु आपला फायदा नक्कीच आहे आपल्या आयुर्वेदात तिळाच्या तेलाला इतकं महत्त्व आहे परंतु आपण बॉडी लोशनचा विचार करतो त्या बॉडी लोशनचे दुष्परिणाम कालांतराने आपल्याला नक्की जाणवतात .पंचकर्मामध्ये वमन विवेचन नस्य रक्त मोक्षन व आजारानुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात आयुर्वेद आपल्याला आजारी पडू नका असे सांगते परंतु आपल्याला त्यासाठी निसर्गासोबत चालावे लागेल आपण जर निसर्गाच्या विरुद्ध चालू लागलो तर कुठलीच चिकित्सा आपल्याला आजारापासून रोखणार नाही असे प्रतिपादन यावेळेस डॉक्टर रूपाली देशमुख यांनी व्यक्त केले

या कार्यक्रमास सतिश निर्वळ ज्ञानेश्वर सरकटे गजानन देशमुख भाऊसाहेब गोरे दारासिंगं चव्हाण गोपाळराव बोराडे भगवान देशमुख नितीन सरकटे शरद पाटील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत