राहुल लोणीकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी-नितीन सरकटे पाटील
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सक्षम पणे सांभाळत युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांना राजकारणात उभारी घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे युवानेते राहुल लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते. परतूर मंठा मतदार संघातील लोकांच्या सुखा दुखात सदैव सहभागी असणारे श्री. राहुल लोणीकर सारख्या युवा नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी द्यावी अशी माघणी भाजपा युवा मोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष नितीन सरकटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.राहुल लोणीकर यांनी ६११ जोडप्यांचे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा परतूरमध्ये मोठ्या थाटात संपन्न केला होता. कोविड काळात त्यांनी गोरगरिबाच्यासेवेत होते. मतदार संघातील गोरगरीब लोक पोट भरण्यासाठी संभाजीनगर, पुणे, मुंबई या ठिकाणी असताना देखील 'त्या ठिकाणी त्यांना कोविड काळामध्ये धान्याची आवश्यकता असताना मदत करून हॉस्पिटल मध्ये देखील मदत केली. कोविड काळात होणारा रक्ताचा तुटवडा पाहून मराठवाड्यात विक्रमी रक्तदान करून घेणारा युवा नेता शेतकऱ्याचे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा आणखीन कुठले प्रश्न असो प्रत्येक गोष्टीमध्ये ते अग्रेसर असतात म्हणून असे सामान्यतील असामान्य नेतृत्वाला विधान परिषद वर घेऊन पक्षश्रेष्ठींनी मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन सरकटे यांनी केली आहे..
मतदार संघातील युवा कार्यकर्त्याची मोठी फळी राहुल लोणीकंरा सोबत असून युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष्य पदाच्या कार्यकाळात पक्ष्याच्या प्रवाहात युवा कार्यकर्त्यांना जोडण्याचे मोठे काम सघटनेच्या माध्यमातून केले आहे यामुळे त्यांना विधान परिषेदेवर घेऊन युवकांचे प्रश्न मार्ग्री लागतील असा आशावाद नितीन सरकटे यांनी व्यंक्त केला