Posts

Showing posts from May, 2025

उघड्यावर मास विक्री करणारे विक्रेते तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणऱ्या वर परतूर पोलीसांची कार्यवाई

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण पोलीस ठाणे परतुर हद्दीतील उघड्यावर मास विक्री करणारे विक्रेते तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते आणि रस्त्यावर वाहने उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करणारे वाहन चालक यांच्यावर परतुर पोलिसांनी केली कारवाई.          काल रोजी जालना शहरात घडलेल्या एका पाच वर्षीय मुलीचा मोकाट कुत्र्यांनी जावा घेतल्याने मृत्यू झाला. या संबंधाने अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस ठाणे हद्दीतील ज्या ठिकाणी उघड्यावर मास विक्री करणारे विक्रेते व मासाचे रॉ मटेरियल उघड्या जागेवर टाकून त्याला कुत्रे व इतर प्राणी खाऊन सदरची घटना झाली आहे या अनुषंगाने उघड्यावर मास विक्री करणारे व मासाचे रॉ मटेरियल उघड्यावर टाकणारे मास विक्रेते यांच्यावर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फळ व भाजीपाला विक्रेते तसेच रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करणारे वाहन चालक या संबंधित व्यक्तीवर कारवाई करून खटले दाखल करण्यात आले आहेत.  1)उघड्यावर मास विक्री करणाऱ्या 10 व्यक्तीवर कार्यवाही करण्यात आली 2) रस्त्यावर भाजी...

लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय परतुर इयत्ता बारावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम

Image
* परतुर - प्रतिनीधी कैलाश चव्हाण  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळांनी इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला असून लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय परतुर कला, विज्ञान वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल 66.77 लागला असून महाविद्यालयातून एकूण 915 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेत सर्वप्रथम कु. पवार पल्लवी 81 टक्के, सर्व द्वितीय कु.धुमाळ वैष्णवी 78.83% सर्व तृतीय वितळे नम्रता 78.17%   वाणिज्य शाखा सर्वप्रथम पाठक ऋतुजा 80.50 टक्के सर्व द्वितीय कळणे गायत्री 79 50%सर्वत्रितीय शिकलगार रेहान 72.17%  कला शाखा सर्वप्रथम किरण बेरगुडे 90.67%द्वितीय आरती मोहिते सर्व तृतीय रोहिणी 85 टक्के रोहिणी बिजूले 79.50%   या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात संस्थेचे सचिव कपिल भैया आकात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.कुणाल दादा आकात लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. यावेळी महाविद्यालया...

शर्मा चे सख्खे भाऊ-बहीण झाले डॉक्टर

Image
परतूर प्रतिनिधी – कैलाश चव्हाण  शहरातील किरकोळ कपड्याचे व्यापारी गोपाल जगन्नाथ शर्मा यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्या मुलांनी म्हणजेच डॉ. अभिजीत गोपाल शर्मा व डॉ. समीक्षा शर्मा या सक्ख्या भाऊ-बहीणीने हे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण केले आहे. दोघांचेही प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण परतूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी MGM School of Physiotherapy या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. पाच वर्षे अथक मेहनत, अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी फिजिओथेरपी (भौतिक उपचार) या वैद्यकीय शाखेतील पदवी प्राप्त केली. फिजिओथेरपी ही होमिओपॅथी (BHMS), आयुर्वेद (BAMS), आणि अ‍ॅलोपथी (MBBS) प्रमाणेच एक स्वतंत्र वैद्यकीय शाखा असून, यात व्यायाम, उष्णता, बर्फ, कंपन (vibration), आणि इलेक्ट्रिकल उपकरणांच्या साहाय्याने उपचार केले जातात. या क्षेत्रात डॉ. अभिजीत शर्मा हे परतूर तालुक्यातील पहिले पुरुष फिजिओथेरपिस्ट ठरले असून, हा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. समीक्षा व अभिजीत या दोघांवर शिक्षक, प्...

ऊस्वद येथील पूर्णा नदी पात्रात तहसीलदाराची कारवाई तीन टेम्पो ताब्यात,तीन दिवसात चार टेम्पोवर कारवाई,दुचाकीवर येऊन केली कारवाई

तळणी प्रतिनिधी रवी पाटील   पूर्णा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर गेल्या तीन दिवसांपासून कारवायांचे सञ मंठा तहसिलदार सोनाली जोंधळे याच्यासह पथकाकडून चालूच आहे . टाकळखोपा येथे ३० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आल्यानंतर बुधवारी एक टेम्पो पकडल्यानंतर आज सकाळी शुक्रवारी सकाळी पाच वाजता उस्वद येथील पूर्णा नदी पात्रात तीन टेम्पो पकडून मंठा येथील शासकीय गोडामात लावण्यात आले . रात्री पासून गस्तीवर असलेल्या तहसीलदार यांना वाळू चोर नदी पात्रात उतरल्याची माहिती मिळाली होती उस्वद येथे कारवाई करायची म्हणजे महसुल प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हाहन आहे .  काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महसुल पथकाला शिवीगाळ करून नदीपात्रातून हाकलून दिले होते . उस्वद येथील वाळू चोरावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत  शासन मान्य लिलावाला होत असलेला विलंब वाळू चोरांच्या पथ्यावर पडत आहे . कानडी येथील प्रस्तावित वाळू घाटातून उत्खनन सुरू आहे . गेल्या वर्षभरात एक कोटी तीस लाख रुपयांचा महसुल अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून करण्यात आला आहे . आज झालेल्या कारवाईतून साडेचार लाख रुपयांचा महसूल शासनाला...