जीवनात अवैध मार्गाने संचय केलेले धनच बनते मनुष्याच्या दुःखाचे कारण-विजय महाराज वाघ
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
द्रव्याचा चा तो आम्ही धरीतो विटाळ तुकोबारायांनी कधीच द्रव्याला धन मानले नाही तुकोबारायांनी कधीच संपतीला साधन मानले नाही तुकोबारायोकडे असे कोणते धन आहेत जे त्याला श्रेष्ठ मानतात तुकोबां रायांनी मानाचा कधीच स्वीकार केला नाही की कधी त्यांना त्याचा हव्यास त्यांना आला नाही . स्वर्ग आणि ब्रम्हपदाच्या धनाचा कधी त्यांनी विचार केला नाही तुकोबाना मान नको धन द्रव्य नको इंद्रपदाचे धन नको मग तुकोबांना नेमके कोणते धन साठवण्याचा सांगीतले तर विठ्ठल विठ्ठल हे धन आम्ही जतन केले . त्याचा उद्योग आम्ही सुरु केला . मग विठ्ठल धन आहे का परतू तुकोबा हे विठ्ठलाला धन मानतात तर तो विठल धनाचे कार्य करतो का ज्या वस्तू ला आपण जो दर्जा देतो ते कार्य त्याने केल पाहिजेकिर्तन करून धन द्रव्य गाडी घेऊन जर जमा करता येते तर हे सर्व वेश्येकडे सुद्धा आहे ना जर किर्तनातून अभिलषा ठेवली तर ते धन वेश्येने प्राप्त करून घेतले हे समजावे जीवनातअवैध मार्गाने संचय केलेले धनच बनते मनुष्याच्या दुःखाचे कारण असे प्रतिपादन विजय महाराज वाघ बनकर यांनी तळणी येथे केले श्री संत नेमिनाथ महाराजांच्या 72 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी गुंफले जगद्गुरु तुकाराम
यांच्या जतन करीन जीवे शुद्ध भावे करुनी विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे वर्दळ हे संचित सारू भरवा करू उदिम हा अभंगावर त्यांनी चिंतन केलेखरोखर मनुष्याला संसारिक आयुष्यामध्ये किती धनाची गरज आहे व ते धन प्राप्त करण्यासाठी कुठला मार्ग तो मनुष्य अवलंब करतो हे त्याच्या आध्यात्मिक संस्कार आवर अवलंबून असते कष्टाने कमवलेला पैसा मनुष्य हा त्याच्या बुद्धीमतेने त्याचा वापर करतो परंतु ज्याच्याकडे अन गणित आहे त्याला त्याला धनाचे महत्त्व काय करणार परंतु संत महात्म्याच्या जीवनात धनाला कधीच महत्त्व नसते जगद्गुरु तुकोबाराय यांनी कधीच धनाचा स्वीकार केला नाही त्या काळात सुद्धा तुकोबाराय प्रगल्भ होते परंतु त्यांनी धनाचा स्वीकार न करता विठ्ठल विठ्ठल नामाचा स्वीकार केला जो की त्यांना वैकुंठ प्राप्तीला कारणीभूत ठरला आजकाल मनुष्याने त्याच्या आयुष्यात धनप्राप्तीपेक्षा भगवत भक्तीच्या पाठीमागे लागणे काळाची गरज आहे कलियुगामध्ये भागवत साधने शिवाय कुठलाही उपाय मानवी उद्धारासाठी नाही तुमच्याकडे संपत्ती का पाहून तुम्हाला कोणीही मोठे म्हणणार नाही कारण की संपत्ती असणारे खूप आहेत पण श्रद्धेची संपत्ती भगवत साधनेची संपत्ती ही त्यापेक्षा काही पटीने मोठी आहे ती साधनात मनुष्याच्या आयुष्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही
धनप्राप्तीचे मार्ग स्वीकारण्याच्या ऐवजी आपण भागवत भक्तीचा मार्ग स्वीकारला तर तो मनुष्याच्यामनुष्याच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त धन हे काहीच कामाचे नाही जास्तीचे धने अविचारी मार्गाने मनुष्याला घेऊन जात असते ती सांभाळण्याची कुवत सुद्धा त्याच्यात असली पाहिजे ज्यांच्याकडे सांभाळायची कुवत आहे त्यांच्याकडे धन नसते आणि ज्यांच्याकडे धन आहे त्यांना ते कसे सांभाळावे हे माहीत नसते हे एक विशेष असते मात्र भगवत भक्ती मध्ये तसे नाही तुम्ही कितीही भगवत भक्ती करा तिचा संचय होतच राहत असतो व तोच पुण्य संचय मनुष्याच्या अंतकाळाला कामी येत असतो
ज्ञानोबा तुकोबारायणी विठ्ठल नामाच्या धनाची साठवण केली सगळ्या धनापेक्षा विठ्ठल नामाचे दोन्ही श्रेष्ठ आहे सगळ्यांनी ते अंतरंग होऊन जर त्या विठ्ठल नामाचा विचार केला तर तो सहज प्राप्त होईल गरज आहे ती त्याच्या नामाचा विचार करायची ज्याचे भाग्य चांगले आहे त्यालाच विठ्ठल नामाचा विचार सुचत असतो .
अनिती मार्गाने कमावलेले धन हे आपल्या पिढीसाठी व आपल्यासाठी त्रासदायकच असते कारण की अनिती मार्गाने कमवलेल्या धनाची किंमत माणसाला कळत नाही कष्टाने कमवलेल्या धनाचीच किंमत माणूस करू शकतो आणि तिने कमावलेला पैसा हा वाम मार्गाला लावल्याशिवाय राहत नाही त्यासाठी धन हे उत्तम मार्गाने जर कमवले तर ते धन आपल्याला उत्तमच मार्ग दाखवेल असेही सांगितले