पाडळी शिवारात शेती रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागनी, गावकऱ्यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तालुक्यातील पारधी पाडळी येथील शिवारात शेतकऱ्यांना शेतात रस्ता करून देण्याची मागणी येतील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे पाडळी पारधी या गावचे पुनर्वसन परतूर वाटूर रोडवर नागापूर पाटीजवळ झालेले आहे. सदरील पुनर्वसन ते जुने पाडळी गाव हें सहा किमी अंतरावर बसलेले आहे. पुनर्वसन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या जुन्या गावाजवळ आहेत. जवळपास ५०० ते ६०० एकर जमीन या रस्त्यावर वहिती करणे अवलंबून आहे. गावात जाणारा सहा किमी प्रयन्त शेतरस्ता पूर्ण खराब झाला आहे, त्या पैकी दोन किमी रस्ता झाला आहे. उर्वरित चार किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पुनर्वसन येथिल शेतकऱ्यांना आपली शेती वहिती करण्यासाठी रस्ता नसल्याने शेतमाल वाहतून करणे व वाहतूकसाठी अडचणीत येत आहे. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होत असल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत असल्याने पाडळी गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चार किमी रस्ता त्वरित करुन द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच प्रसाद काकडे , उपसरपंच शामराव काळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मस्के, भास्कर बोराडे, संदीप मस्के, रमेश काकडे, वैभव बोराडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रतिलिपी आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधीकरी, उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिल्या आहेत.