लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे अभूतपूर्व यश


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
आमच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा (फेब्रू- 2025) 12 वी कला शाखेतून 90.67 गुण मिळवून सर्व प्रथम आलेला गुणवंत विद्यार्थी किरण किसन बेरगूडे ह्याची नुकतीच फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे ( B.A) अभ्यासक्रमासाठी निवड झाली. 
आज महाविद्यालयामध्ये संस्था सचिव तथा महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आदरणीय कपिल  आकात यांच्या शुभ हस्ते किरण बेरगूडे आणि त्याच्या पालकांचा यथोचित सन्मान करून त्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सत्कारमूर्ती किरण बेरगुडे, वडील किसनराव बेरगुडे, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. खंदारे सर , प्र.उपप्राचार्य प्रा.सोनपावले सर, कार्यालय प्रमुख प्रभाकर सुरुंग, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात