छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचे युनेस्को तर्फे जागतिक वारसा म्हणून निवड झाल्याबद्दल परतूर भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचे युनेस्को तर्फे जागतिक वारसा(Heritage) म्हणून निवड झाल्याबद्दल परतूर भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
परतूरचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले.
भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांनी प्रास्ताविक करतांना ही गोष्ट समस्त शिवप्रेमींसाठी अभिमान व गौरवाची गोष्ट असे सांगून बारा किल्ल्यांच्या स्थापत्य कलेवर प्रकाश टाकत सरकारच्या विविध स्तरावरील प्रयत्नांची व 12 किल्ल्यांची सविस्तर माहिती दिली ह्या माध्यमातून पर्यटन वाढीला लागेल आणि हिंदवी स्वराज्य महती जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल सर्वांच्या वतीने हर्षोल्लास व्यक्त केला...
भाजप तालुका संघटन सरचिटणीस सावता काळे यांनी पुढे बोलतांना अखंड हिंदुस्तान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यांनी पुढे सांगितले की देशातील व महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती की महाराजांचा ज्वलंत इतिहास येत्या काळात विदेशातील शिवभक्त देखील महाराजांचा आदर्श घेतील, त्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परतूरचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, महाराष्ट्राचे युवा नेते राहुल भैया लोणीकर यांच्या यशस्वी प्रयत्नाने व देशातील कर्तबगार अधिकारी यांनी १२ किल्ल्यांच्या बाजूने जी २० मते मिळवून दिली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
ह्यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते भगवान तात्या मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध कार्याचा उल्लेख करत हा क्षण सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते ओमप्रकाश मोर, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष राजू म्हस्के, भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष अजित पोरवाल, भाजपा तालुका उपाध्यक्ष ॲड सुरेश काळे, भाजपा शहर सरचिटणीस आनंद कोटेचा, भाजपा शहर उपाध्यक्ष अमोल अग्रवाल, अभिजित जोशी, गणेश अग्रवाल, मुन्ना चित्तोडा, गोविंद मोर, बंडू मामा नवल व नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते...