धर्माच्या रक्षणासाठी जातीभेद विसरून एकत्र येण्याची गरज,मराठवाड्यातून विदर्भापर्यंत धर्म संस्कृती व राष्ट्रचैतनेचा ऐतिहासिक व पवित्र संकल्प
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
सद्यस्थितीत आपला सनातन हिंदू धर्म हा अनेक संकटांना सामोरे जात आहे यामध्ये धर्मांतर हा विषय प्रामुख्याने आहे लव्ह जीहाद यासारख्या घटना आपल्याला आव्हान देत आहेत पश्चिम बंगालमधील हिंदू वर होत असलेल्या अत्याचारा असो की जळत असलेले मणिपूर याला कारण फक्त विखुरलेला आहे मी समाज आपण बहुसंख्यांक असून सुद्धा आपल्यावरच याचे आघात होत आहेत भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्याला एक संघ राहावे लागेल जातीभेदाच्या भिंती तोडून आपण सर्व हिंदू आहोत प्रत्येक हिंदू हा माझा बंद आहे हा भाव जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाहीतआपली एकीचीवज्रमूठ समोरच्याला जागेवर बसू शकतेअखंड भारताचा इतिहास आपण जर बघितला तर आपण अधिक प्रमाणात गमावून बसलेला भाग आहे इराण आपले होते आपण बांगलादेश गमावून बसलो आपण पाकिस्तान गमावून बसलो नेपाळची पण फारशी परिस्थिती चांगली नाही जगाच्या पाठीवर एकमेव असलेले हिंदू राष्ट्र टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती तोडून आपल्याला एक संघ राहाव लागेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथावाचक विवेक दास शास्त्री महाराज यांनी आज तळणी येथे केले
यावेळी बोलताना त्यांनी या यात्रेचा उद्देश उपस्थित त्यांना सांगितला ही यात्रा सांस्कृतिक अस्तित्व व हिंदू समाजाला जागृत करण्यासाठीच काढली आहे ही यात्रा धर्मनिष्ठा संघटनव आत्मगौरव पुन्हा जागविणारा जनजागरणाचा महाअभियान ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
ही यात्रा कोण्या धर्माच्या विरुद्ध नाही ही यात्रा फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी आहे गायीच्या संरक्षणासाठी आहे आज हजारो गाईंची कत्तल होत असताना सुद्धा झोपलेला हिंदू समाज याकडे कधी डोळे उघडून बघणार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले धर्मवीर संभाजी महाराजांनी सुद्धा आपले बलिदान धर्मासाठी दिले आपण त्यांचा आदर्श घेणार तरी कधी त्यांच्या त्यागामुळेच आपण आज सुरक्षित आहोत परंतु त्यांनी केलेले कार्य मात्र आपण विसरत चाललो आहोत
या यात्रेचा हेतू केवळ धार्मिक नसूनराष्ट्रीय सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ही आहे हिंदू राष्ट्राची संकल्पना श्रीकृष्ण जन्मभूमीमुक्ती आंदोलनकाशी विश्वनाथ ज्ञान वापी यासारख्या पवित्रअस्मितेचे रक्षण करण्यासाठी या यात्रेची संकल्पना आहे
भारत मातेच्या सरक्षणासाठी अनेकांनी आपले बलीदान या मातृभूमी साठी दिले आहे सध्याचा तरुण हा बेभान होवून जात आहे त्यांना संस्काराची गरज आहे . भारताची अस्मीता असलेल्या राममंदीराला सुद्धा पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला . हिंदू धर्मावर अनेक आघात होत गेले पंरतू आताची परिस्थिती वेगळी आहे हिंदु समाजाला पोखरण्याचे काम सुरू आहे यासाठी आपण प्रत्येकाने सावध राहावे लागणार आहे तरच आपले अस्तित्व टिकून राहील आपली संस्कृती टिकली तरच आपला देश टिकेलयासाठी आपली एकीची वज्रमुठ असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह भ प गजानन महाराज सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केले व्यासपीठावर अनेक महाराज मंडळींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी यात्रेचे स्वागत दत्त मंदिर संस्थान पासून ते तळणी बस स्टॅन्ड पर्यंत ठिकठिकाणी करण्यात आलेरांगोळ्या व फटाक्याच्या आतिषबाजी यावेळी करण्यात आली महाप्रसाद घेतल्यानंतर यात्रा विदर्भाकडे प्रस्थान केली