दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तभ बनवा-विकासकुमार बागडी
जालना प्रतिनीधी समाधान खरात
जालना शहरात दिवंगत पत्रकारांच्या नावे एकही स्तंभ नसून या पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून त्यासाठीच त्यांच्या ही नावे शहरात एखादा तरी स्तंभ असावा आणि तो जालना शहर महापालिकेकडे व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
यासंदर्भात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, माजी सैनिक आदींच्या नावाने शहरात अनेक रस्ते, चौक, कमान बांधण्यात आलेले आहेत. पण या सर्वांची कामाची प्रसिध्दी करणारे चौथा स्तभ म्हणजेच पत्रकारितेच्या नावे कुठेही आणि कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावर एकही स्तभ नाही. जालना शहराच्या मध्यभागी म्हणजेच टाऊन हॉल येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र स्तंभ उभारण्यात यावा, जिल्ह्यात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या नावे असा पत्रकार स्तंभ असेल तर तो चांगलाच आहे.
शशिकांत पटवारी, उदय पटवारी, लक्ष्मण पायगव्हाणे, गणेश जळगांवकर, सतीष सुदामे, दिगंबर शिंदे, रमण गायकवाड, मनोहर बुजाडे, श्रीकृष्ण भारुका, शेख अलीम, अबुल हसन, राजे