तळणी मंडळात २४ तासात १४७ मि मि रेकार्ड ब्रेक पाऊस,तळणी परिसरात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील तळणी परिसरात ढगफुटी सारखा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले . खास करून नदी काठावरील शेतजमीनी अक्षरशः खरडून गेल्या वळणे फुटली तर अनेक शेतकर्याच्या विहीरीमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने गाळ जाऊन बसला तळणी परिसरात २००६ नतंर पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला . या वर्षात पावसाळा सुरू झाल्यापासून तळणी परिसरात पिकांना पुरेसा असा पाऊस पडत असल्याने यावर्षी पिकांची परिस्थिती छान होती वेळेवर झालेली पेरणी व पोषक वातावरण निर्माण झाल्याने यंदाचा हगाम हा शेतकर्यावर कृपा करेल असे वाटत असतानाचा मंगळवार च्या रात्री सलग सात तास पडलेल्या पावसाने शेतकर्याच्या स्वप्नावर विरजण पडले .
या एकाच पावसात तळणी परिसरातील छोटे मोठे तलाव पूर्णपणे भरल्या गेले आहेत . तळणी पासून जवळच असलेल्या बेलोरा येथील दोन छोटे तलाव फुटल्याने बेलोरा व वझर सरकटे गावातील शेतीचे नुकसान झाले . विशेष बाब म्हणजे तळणी गावालगतच जाणार्या ओढ्याला कोकरबा शिवारापासून पाणी येऊन मिळते त्यामुळे पाण्याची मोठी आवक या ठिकाणी असते या ओढ्यावरील जवळपास चार ते पाच तलाव भरून वाहिल्याने त्या सर्व तलावाच्या सांडव्याचे पाणी एका सोडण्यात आल्याने सर्व पाणी अनेक शेत जमिनीत असल्याने शेतकऱ्यांचे झाले अनेक शेतर रस्याची दुरावस्था या पावसाने झाली मुख्य पीक सोयाबीन तूर मूग उडीद कपाशी चे मोठे नुकसान झाले विदर्भातून येणारी सरसस्वती नंदीचे पाणी वडगाव सरहद या गावात घुसल्याने ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागला . सरस्वती नंदीलगतच्या अनेक जमीनी खरडून गेल्या या सर्व शेत जमीनीच्या व पिकांच्या नुकसानीसाठी विशेष पैकेज शासनाने जाहीर करावे अशी मागणी शेतकरी वर्गात होत आहे
जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार या सर्वांना मंठा परतूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यास प्रयत्न करणार
बबनराव लोणीकर ,आमदार परतूर मंठा
मंठा व परतूरच्या दोनही तहसीलदारांना पंचनामा
करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत मी स्वःत पाहणी करणार आहे नुकसानीची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून यासदर्भात शासना कडे अहवाल सादर करण्यात येईल
पद्माकर गायकवाड उपविभागीय अधिकारी परतूर
या वर्षी दोन एकर मध्ये हळदीची लागवड केली थिबंक चा मोठा खर्च केला दोन एकर मधील थिबंक वाहुन *गेले हळदीचे पण मोठे नुकसान झाले
महादेव खंदारे शेतकरी वडगाव