नियम डावलून घेण्यात आलेली निवडणूक पुन्हा घेण्याची सभासदांची मागणी,सहकार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या निवडणुकीत नियम डावलून निवडणूक घेण्याचा आरोप करत सभासदांनी सहकार आयुक्त यांना लेखी निवेदन सादर करत निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे
निवेदनात असे म्हटले आहे की, सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. परतूर ता. परतूर जि. जालना या संस्थेच्या निवडणुक प्रक्रियेचा वेळ,अंतिम मतदार यादी नावे समाविष्ट पत्र वाटप वेळ सकाळी १०.३० ते ११.००, प्राप्त नामनिर्देशन पत्र छाननी करणे स. ११.०० ते ११.१५., छाननी अंतिम पात्र उमेदवारांची नावे घोषित करणे सकाळी ११.१५ ते ११.३०., नामनिर्देशन पत्र माघारी घेणे सकाळी ११.३० ते १२.००, निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी घोषित करणे दुपारी १२.०० ते १२.१५., मतदानाची वेळ दुपारी १२.१५ ते १.१५., मत मोजणीची वेळ दुपारी १.१५ ते संपेपर्यंत तरी या भ्रष्ट निवडणुक अधिकारी आ.सां.गुसिंगे व बी. टी. लिंगायत यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करुन व निवडणुक नियमाचे उल्लंघन करुन दुपारी तीन वाजेच्या नंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात करुन एकतर्फी निवडणुक प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे सदरील भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन करुन फेर निवडणुक करण्यात यावी व या झालेल्या निवडणुकीची उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही झालेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेले सर्व सभासद जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु, होणाऱ्या परिणामास आ.सा. गुसिंगे व बी.टी. लिंगायत हे स्वतः जबाबदार राहतील याची शासनाने नोंद घेण्याचे ही सांगण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेचे जवळपास सर्वच नियम डावलून व सभासदांना विश्वासात न घेता निवडणूक प्रक्रिया पार पाडली यासर्व प्रकारामागे आर्थिक देवाण घेवाण झाली आहे. तसेच प्रशासनाने या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी तसेच जंगम मालमत्ता त्याब्यात घ्यावी. प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया करण्यात यावी प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास सहकारी सभासदांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयात सुद्धा दाद मागण्यात येईल अशी प्रतिक्रिया सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या.परतूरचे सभासद सागर काजळे यांनी दिली.