निम्न दुधना जलाशयात कार्यक्षेत्राबाहेरील मच्छिमारांकडून अनाधिकृतपणे चोरुन मासेमारी




परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  निम्न दुधना जलाशयात कार्यक्षेत्राबाहेरील मच्छिमारांकडून अनाधिकृतपणे चोरुन मासेमारी करत असल्याचे मापेगाव मच्छीमार सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जालना यांना सदर संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील मच्छीमार निम्नदुधना जलाशयात चोरुन व अनाधिकृतपणे कोळंबी, मासेमारी करत असल्याबाबतची तक्रार दिली होती. 
त्याअनुषंगाने सहाय्यक मत्स्य आयुक्त जालना यांनी पोलीस अधीक्षक जालना यांना पत्र पाठव या प्रजनन काळात अनधिकृत मासेमारी करण्याऱ्यावर कारवाई करण्याचे म्हंटले आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मापेगाव मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेकडे शासन निर्णय दि.०३.०७.२०१९ नुसार निम्नदुधना जलाशय मापेगाव मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेस तलाव ठेका आदेश जा. क्र. मत्स्य/भू ०११२०७/११२/३०१/२०२४, दि.३०.०७.२०२४ नुसार ०५ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी मत्स्यव्यवसायाकरीता ठेक्याने दिला आहे. संस्थेने शासन धोरणानुसार सन २०२५ - २६ या कालावधीचा तलाव ठेका रक्कम व मत्स्यबोटुकली रक्कम नियमानुसार भरणा केलेला आहे. तलाव ठेका अटी, शर्तीनुसार जी ॲन्ड एच अॅक्वा फार्मींग कंपनी पुणे यांचे समवेत जा.क्र.मत्स्य०११२०३/२८९/४३०/२०२४दि.२६.१०.२०२४ अन्वये पी.पी.पी. करार केला आहे. तसेच सदर संस्था शासन धोरणाप्रमाणे संस्थेचे सभासद व परिसरातील मच्छीमारांना मासेमारी रोजगार उपलब्ध करुन देत आहे. तसेच प्रजनन काळामुळे संस्थेने दि. १८.०७.२०२५ पासून कोळंबी व मासेमारी बंद केलेली असतांना सुद्धा तालुक्याबाहेरील गुंड प्रवृतीचे ५० ते १०० मच्छीमार संगनमत करुन तलाव परिसर करजखेड, वाकडी, पाडळी येथे जवळपास १०० ते २०० लोक झोपडी टाकुन वास्तव्य करत आहे. रात्री बेरात्री कोळंबी, मासे चांरुन सेलू येथील दोन ते चार व्यापाऱ्यांना विकत आहेत. त्यांना संस्थेचे कर्मचारी यांनी संबंधीत मच्छीमारांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केल्यास संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विनयभंग, जिवे मारण्याच्या तसेच अँट्रॉसिटी केस करण्याच्या धमक्या देत आहे. अशा प्रकारची संस्थेच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत मत्स्य आयुक्त जालना यांनी पोलीस अधीक्षक जालना यांना पत्र पाठवत या तालुक्या बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालावा तसेच त्यांना प्रतिबंध करत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी आसे शेवटी नीवेदनात सांगीतले आहे

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत