"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले
प्रतिनिधी तळणी रवी पाटील
"संतांचे उपकार आणि त्यांची अनुभूती असल्याशिवाय मनुष्याच्या मनात दान करण्याची प्रवृत्ती निर्माणच होत नाही. संतांच्या साधनेमुळे भूमी पवित्र होते. देवापेक्षा जास्त अधिकार साधू-संतांचाच असतो. म्हणूनच आपण संतांच्या चरणी शरण जातो," असे प्रभावी प्रतिपादन ह. भ. प. विशाल महाराज खोले यांनी येथे केले.
श्रावण मासानिमित्त नळडोह येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक महिन्याच्या कालावधीत धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ तसेच अन्नदानाचे भव्य आयोजन पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडत आहे.
कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले, "या परिसरावर श्री संत जनार्दन महाराज यांचे अमूल्य उपकार आहेत. त्यांच्या सातत्याने चाललेल्या साधनेमुळे ही भूमी पुनीत झाली आहे. दान करण्याची कृती ही मनुष्याच्या अंतरात्म्यात संतांची कृपा असल्यानंतरच प्रकट होते. एखाद्या वेळेस परमेश्वराकडे जाणारा प्रवाह थांबू शकतो, मात्र संतांच्या प्रेमाने तयार झालेला प्रवाह हा कधीच थांबत नाही."
यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या "वैद्य एक पंढरीराव आंतरभाव तो जाणे" या अभंगातून संतांच्या कार्याची गोडीने व्याख्या केली. अभगावरील निरूपण ऐकून उपस्थित श्रोते भारावून गेले.
मनुष्याला जर एखादा रोग जडला तर तो वैद्याकडे जातो आणि उपचार करतो रोग जसा बरा व्हावा म्हणून आपण जसे चांगल्या वैद्याच्या शोधात असतोच . या सगळ्यांच्या वैद्य माझा पढरीचा पांडुरंग आहे तुम्ही आम्ही सर्वांनी त्याला शरण जा तो आपले सर्व दुःख नाहीशे केल्याशिवाय राहणार नाही . ज्याच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे ना त्याच्यावर देवाची कृपा द्रष्टी असतेच
आज काल वयोवृद्ध व्यक्तीचा आई वडीलांचा सांभाळ न करण्याचे पाप अनेकांच्या हातून घडत आहे पण त्यांनाही या वृद्धापकाळाच्या काळातून जायचे आहे त्याकरीता त्यांच्या सेवेसाठी आपण तत्पर असने गरजेचे आहे असे प्रतिपादन शेवटी महारांजानी केले
कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिक, महिला, युवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अन्नदानाच्या कार्यक्रमात भक्तजनांनी श्रद्धेने सेवा केली. धार्मिक वातावरणात रंगलेला हा उपक्रम श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
तुकाराम महाराज म्हणतात की येथे खरा कोण वैद्य असेल किंवा ह्या संसारात, ह्या जगात सर्व रोगाचे निदान करणारा आणि त्यावर उत्तम उपाययोजना करणारा जर कोण एकमेव धन्वंतरी असेल तर तो आहे पंढरीचा राजा श्री हरी विठ्ठल. कारण तो येथे लोकांच्या मनातले जाणतो, त्याचा अंतर्भाव सहज ओळखतो, त्याला काहीही सांगावे लागत नाही. आणि वर रोग्याला झालेल्या रोगाप्रमाणेच त्यांचा इलाज करतो, त्याला नेमकी कोणती बाधा झाली असेल याचे योग्य ते निदान करून त्याप्रमाणेच वनस्पती देतो किंवा औषधोपचार करतो.
ते पुढे म्हणतात आणि ह्या सर्वांसाठी कोणाला येथे एकही रुपया द्यावा लागत नाही की काही मोल खर्च करावे लागत, त्याला जर काही द्यायचे असेल तर दोन प्रेमाचे शद्ब बोलावे कारण तो देखील त्याचीच आस धरून असतो आणि त्यासाठी तो काहीही करावयास तयार होतो.