ज्ञानोबा तुकोबा शिवबा शिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. शिव व्याख्याते अविनाश पाटील


तळणी प्रतिनिधी रवी पाटील
 आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्या संत परंपरेच्या त्यागानेच त्यांच्या कष्टाने त्यांच्या समर्पण भावानेच आपण आज वाटचाल करत आहोत या वाटचालीमध्ये अनेक वीर पुरुषांचाही मोठा सहभाग त्यांचे बलिदान असल्यामुळेच आपण आज सप्ताह साजरे करतो आहे .या महाराष्ट्रात माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन शिवव्याख्याते अविनाश महाराज पाटील यांनी तळणी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात केले

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसूनी देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे या अभंगावर निरूपण केले जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गाथा निर्माण करताना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं त्यासाठी अपार कष्ट तुकोबांना झेलावे लागले परंतु तो गाथा आपल्याला सहज मिळाला आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे देहू परिसरातील डोंगरावर तुकोबांनी ज्ञानसाधना करून त्याच साधनेच्या जोरावर वैकुंठा गमन केले मनुष्याच्या जीवनात निस्वार्थ साधना केल्यावर काय फळ मिळते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय होय .
     तुकोबांनी देहासकट वैकुंठ गमन करून विश्वाचा एक लौकिक चमत्कार ज्या संत महापुरुषांनी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला त्याच तुकाराम महाराजांना वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षापर्यंत अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले परंतु पांडुरंग परमात्म्यावर असलेली निष्काम भक्ती त्यांची असलेली एकाग्र साधना याच जोरावर तुकोबारायांनी वैकुंठ गमन प्राप्त केले .
ज्ञानोबा तुकोबा आणि शिवबा यांच्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज .या महान विभूतींना बघून महाराष्ट्राचा व देशाचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही त्यांच्या त्यागो बलिदानाच्या जीवावरच आज आपण जगतोय याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे .सध्या सोशल मीडियाच्या वातावरणात जातिभेदाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला लागू देऊ नका ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण करतात ते स्वतःसाठी नाही तर स्वराज्यासाठी करतात आपल्यासाठी करतात याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे आपल्या संतांनी सुद्धा कधीच जातीभेद केला नाही आपल्या वीर पुरुषांनी सुद्धा कधी जातीभेद केला नाही तर तुम्ही आम्ही जातीभेद करणारे कोण .छत्रपतींच्या काळात या गोष्टीला कधीच थारा नव्हता आपल्या सर्व संत महात्म्यांनी एकोप्याचा संदेश आपल्या अनेक वाङ्मयातून दिलेला आहे त्या वाङ्मयाचा आधार आपण घेतला पाहिजे त्याचा विचार त्याचा आचार त्याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने करणे ही काळाची गरज आहे .राज्यकर्त्यांच्या डोक्यात असलेली जातीवादी विचार हे आपल्यासारख्या पर्यंत पोहोचण्याची काम काही करत असतात त्याला आपण बळी पडता कामा नयेआपण सर्व एक आहोत हाच एक संदेश आज जगासमोर जाणे आणि तांत गरजेचे आहे आणि तो संदेश जाण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सप्ताह आहे त्यासाठी एकोप्याने एक दिलाने हे कार्य पुढे जाणे सुद्धा गरजेचे आहे .

*चौकट
*परमार्थिक वृत्ती जोपासली तर द्वेष पवृत्तीचा शिरगाव मनुष्याच्या बुद्धीला कधीच होणार नाही परमार्थिक बुद्धी ही प्राप्त करायची असेल तर आपल्याला संगतही सात्विकतेची लागेल संस्कारिकाची लागेल परमार्थिक माणसाने अहंकारापासून दूर असणे गरजेचे आहे तरच त्याने केलेल्या साधनेचा उपयोग त्याच्या जीवनात होईल अन्यथा त्या साधनेचा उपयोग होणार नाही निस्वार्थ भावनेतून केलेली साधनात हीच भगवंताला प्रिय असते त्या साधनेचा स्वीकार तुम्ही आम्ही करणे गरजेचे आहे*

आपल्या देशाला गुलामगिरीच्या तावडीतून सोडण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचे बलिदान केले आहे ते बलिदान देऊन ते स्वतःउद्धार केला आहे सावरकरांसारख्या युद्धाला पन्नास वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा इंग्रज प्रशासन सुनवते वीर भगतसिंग राजगुरू सुखदेव या तरुण क्रांतिकारांना तरुण वयात शिक्षा दिली त्यांचा त्याग त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा त्यांचे समर्पण आपण डोळ्यासमोर सतत ठेवले पाहिजे त्यांचे स्मरण आजच्या तरुणाला होणे गरजेचे आहे तरच आपल्या देशाच्या त्यागाचा इतिहास उजळत राहील व तो कायम स्मरणात राहील याचे भान आजच्या पिढीने ठेवणे गरजेचे आहे

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात