विवेकानंद विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
राष्ट्रीय दृष्ट्या आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विवेकानंद विद्यालयाचे एकूण 71 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक संदीप बाहेकर, तसेच मुख्याध्यापिका श्रीमती. शिंदे मॅडम सर्व शिक्षक वृंद तसेच पालकांच्या वतीने या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment