वाटर ग्रिड,वृक्ष लागवडीत ग्रामपंतायतीने लक्ष घालावे -आ.लोणिकर
परतूर ( प्रतिनिधी ) मराठवाड्यातील पाणी पातळी मध्ये मोठी घट झाल्यामुळे गेल्या चार-पाच वर्ष मराठवाड्याला 4000 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात होता या पार्श्वभूमीवर आपण मंत्री असताना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी फिल्टर पाणी उपलब्ध करून देण्या साठी परतूर विधान सभा मतदार संघा साठी वॉटर ग्रीड योजना मंजूर केली आज या योजनेचे पाणी मतदारसंघातील 100 गावा पर्यंत पोहोचले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
परतूर येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर ग्रीड योजना व वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की मतदारसंघात राबवण्यात आलेल्या वाटर फिल्टर पाणी 12 रुपये 30 पैशांमध्ये 1000 लिटर मिळत असल्याने ग्रामस्थांना हे पाणी अतिशय स्वस्त पडत असून सरपंच ग्रामसेवक यांनी पुढाकार घेत या योजनेचा लाभ माफक दरामध्ये होत असल्याने करून घ्यावा असे सांगितले पुढे ते म्हणाले की सदरील योजनेचे वीज बिल, केमिकल, व मेंटेनन्स साठी येणारा खर्च ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी द्वारे द्यावयाचा असून प्रति कुटुंब 150 रुपये महिना या प्रमाणे फिल्टर पाणी उपलब्ध होत असल्याने या स्वस्त उपलब्ध असलेल्या फिल्टर पाण्याचा लाभ गावातील जनतेला मिळवून द्यावा असे आ लोणीकर यांनी सांगितले
यापुढे योजना राबविन्याची जवाबदारी ग्राम पंचायतीची असून वाटर ग्रिड मुळे टंचाई निर्माण होणार नाही यासाठी मात्र ग्रामपंचायतींनी सतर्कता दाखवत योजनेच्या मेंटेनन्स साठी लागणारा खर्च पाणीपट्टी वसुली करून निभवावा असेही ते म्हणाले
गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघात दरवर्षी जानेवारीपासूनच टँकर लागायची मात्र ही योजना झाल्यामुळे मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास टंचाईचा सामना करावा लागणार नाही असेही ते म्हणाले
आपण मंत्री असताना मतदार संघ व मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई होती या अनुषंगाने आपल्या भागातील तीव्र पाणीटंचाई कशी दूर करता येईल यासाठी आपण गुजरात, आंध्र प्रदेश, ऑस्ट्रेलिया, इसराईल,आणि श्रीलंका येथे जाऊन ग्रीडची पाहणी करून हा प्रयोग मराठवाडाभर करण्या अगोदर प्रतिनिधिक स्वरुपात परतूर मंठा तालुक्यामध्ये वॉटरग्रीडचा प्रयोग केला तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या योजनेचे पाणी आज मतदार संघातील 100 गावांना पाणी मिळत असून उर्वरित गावांमध्ये लवकरच योजना पूर्णत्वास जाईल असे सांगतानाच या योजनेचा उपयोग ग्रामपंचायतींनी करावा असेही ते म्हणाले
*जलयुक्त शिवार मुळे मोठा फायदा झाला*
=======================
पाणी आडवा पाणी जिरवा ही क्रांतीकारी योजना त्याकाळात वसंत राव नाईक यांनी राबविण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा फारशी जनजागृतीची साधने उपलब्ध नसल्याने योजनेचे फलित मिळाले नाही मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारची जलयुक्त शिवार योजना राबवली या योजनेचा आपल्या मतदारसंघाला मोठा फायदा झाला असून सिरसगाव, लोणी, बामणी, यासह अनेक गावांमध्ये मोठा फायदा झाल्याचेही ते म्हणाले
*वनीकरणाची जबाबदारी सामाजिक वनीकरण सोबतच ग्रामपंचायतींची*
=======================
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत परतूर तालुक्यातील 73 गावातील शेतकऱ्यांनी झाडे लावण्या संदर्भात प्रस्ताव दिलेले असून यापुढे तांत्रिक बाबींमध्ये सामाजिक वनीकरण विभागासह बदललेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन वृक्षलागवडीच्या कामात सहकार्य करण्याचे आमदार लोणीकर यांनी सांगितले
सामाजिक वनीकरण विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सामाजिक वनीकरण विभागावर कामाचा ताण वाढत असून ग्रामपंचायतींनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन वृक्षलागवडीच्या कामामध्ये सहभाग नोंदवावा असेही यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले
या वेळी तहसिलदार रूपा चित्रक, प स सभापती रंगनाथ येवले,उपसभापती रामप्रसाद थोरात, जि प सदस्य हरिराम माने,सुदामराव प्रधान, शिवाजी सवणे गट विकास अधिकारी गुंजकर, प स सदस्य दिगबर मुजमुले, रामेश्वर तनपुरे,प्रदीप ढवळे, विलासराव आकात, नारायण भिसे,भ ज यु मो ता आध्यक्ष शत्रुघन कणसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रबदडे,विभागीय वनाधिकारी वरुडे, वनक्षेत्रपाल मगरडे सरपंच ग्राम सेवक यांच्यासह कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते