शिक्षण समितीला विचारात न घेताच शिक्षणअधिकार्यानी परस्पर चौकशी केल्याचा आरोप


तळणि (प्रतीनिधी)
तळणी येथील जि प प्रशालेचे मुख्याध्यापक एल डी चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी शिक्षण अधिकारी के दातखीळ व ऊपशिक्षण अधिकारी खरात यानी बुधवारी दुपार नंतर शाळेला भेट देऊन  चौकशी केली असता मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या शिक्षण समिती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ व पालक यांना अंधारात ठेवून शिक्षण अधिकार्यानी चौकशी केल्याचा आरोप अध्यक्ष्य संतोष सरकटे शिवसेना ता उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्य कैलास सरकटे यानी केला आहे गावामधुन जिल्हा अधिकारी व शिक्षण विभागाला संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यासाठी बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत 

शिक्षणअधिकार्याच्या भेटीत दोघेच हजर 
 शाळेत झालेल्या अपहारा प्रकरणी भेट देण्यासाठी आलेल्या शिक्षण अधिकारी कैलास दातखीळ यांना दोघेच हंजर असल्याचे निर्दर्शनास आले असुन चार शिक्षकांना नोटीस देणार असल्याची शिक्षण अधिकारी यानी सांगीतले असुन यामुळे पुन्हा एकदा शाळेचा कारभार चव्हाट्यावर आला या प्रकरणाचा एक अहवाल गट शिक्षण अधिकार्याचा तयार असुन तो चौकशी अहवाल कारवाई करण्यास पूरेसा असेल तर त्या अहवालावरच कारवाई करण्यात येणार असल्याचे के दातखीळ यांनी सांगितले काल काही माहिती घेतली आहे सध्या जि परिषद मध्ये कामाचा व्याप जास्त असल्याने उपशिक्षण अधिकारी खरात यांना परत चौकशी साठी पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी यानी सांगीतले  तसेच पोषण आहार बांधकाम कामात अनियमीतता गणवेश वाटप याची सर्व तपासणी करण्यात येईल 
उद्यापासुन वाटप पोषण आहारापासुन जे विद्यार्थी वंचित होते त्यांना वाटप करण्याचे वरिष्ठानी सांगीतले आहे या सपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रीया प्रभारी मुख्याध्यापक एल डी चव्हाण यानी दिली आहे 

मी चौकशीसाठी येणार असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक एल डी चव्हाण याना कळवले होते तक्रारदाराना सुध्दा त्याची कल्पना देण्याच्या सागितले होते चौकशी लवकरच पूर्ण होणार असल्याचे शिक्षण अधिकारी कैलास दात खीळ यांनी सांगीतले 


आम्ही ग्रामस्थानी प्रभारी मुख्याध्यापकाच्या बऱ्याच तक्रारी केल्या पंरतू कारवाई काहीच नाही झाली शिक्षण अधिकार्यानी ग्रामस्थ व पालक यांच्यासमोर ही चौकशी करण्यात यावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल 
ज्ञानेश्वर सरकटे शिवसेना ता उपप्रमुख



Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड