शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांसाठी यावर्षी "काळी दिवाळी", माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची टीका,13 नोव्हेंबरला भाजपा पिठलं भाकरी देऊन करणार आंदोलन


परतूर(प्रतिनिधी)

केवळ सत्तेच्या हव्यासापोटी  कुरघोडी करून  सत्तेवर आलेल्या या महाविकास आघाडी  सरकारकडे  शेतकऱ्यांसाठी कोणताही ठोस अजेंडा  नसून सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे

भारतीय जनता पार्टी  शेतकऱ्यांसह तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर आंदोलन करत निवेदन देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा भाजपा युवा मोर्चा व भाजपा किसान मोर्चा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 नोव्हेंबरला शेतकरी तहसीलदार उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पिठलं भाकर देऊन धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाद्वारे सरकारकडे खालील मागण्या केल्या जातील - 
१) महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबाग झालेल्या नुकसानभरपाई सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहुला 25 हजार व बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी. तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये, कापसाची बोंडअळी बोंडसळी, सोयाबीन, धान्याचे झालेले नुकसान, फळपिकांचे झालेलं नुकसान याकरिता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.
२)  केंद्राच्या MSP कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र मुबलक प्रमाणात सुरु करावीत व दिवाळीतही खरेदी सुरु ठेवावी.
३) यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.
४)  हवामानवर आधारित फळ पीक विमा योजनेचे महाराष्ट्र सरकारने बदललेले निकष अन्यायकारक असून फक्त विमा कंपन्याच्या फायद्याचे आहेत. ते शेतकरी हिताचे विम्याचे बदललेले निकष त्वरित रद्द करून जुने 2018-19 चे निकष कायम करण्यात यावे.
५) किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.
६) सध्या कृषी पंपाचे वितरण मार्च 2018 नंतर संपूर्णत: बंद आहे. ट्रान्सफार्मर जळला तरी नादुरुस्त ट्रान्सफार्मर 24 तासात देऊन दिवसा किमान वीजपुरवठा द्या.
७) रासायनिक खते, बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.
८) कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.
        या सर्व मागण्यांकरिता भारतीय जनता पार्टी च्या वतीने 13 नोव्हेंबरला विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व  भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या निर्देशानुसार आंदोलन करणार आहे. तरी ह्या आंदोलनात सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील लोणीकर यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड