सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

भारतीय क्रांती सेना व नवरात्र महोत्सव समिती यांच्या वतीने महीला बचत गटांना मार्गदर्शन

औरंगाबाद(प्रतीनीधी) भारतीय क्रांती सेनेच्या वतीने व नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते
          यावेळेस जिल्हा अध्यक्षा सौ संगीता  हनवते यांनी महानगरपालिका महिला बचत गट संघटक श्रीमती शारदा त खरात यांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष  वनिता  चव्हाण होत्या 
        या प्रसंगि   उपस्थित महीला बचत गटांना शारदाताई खरात यांनी, पंचशीला महिला बचत गट, त्रिशरण महिला बचत गट, अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट व राजमाता जिजाबाई महिला बचत गट या महिला सदस्यांना बचतीबाबत व शासकीय योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तद्ननंतर  गटातील महिला सदस्यांना  ब्लँकेटचे वाटप केले याप्रसंगी  मंगल उफाडे ,अमृता सावंत, सखुबाई खकाळ, राणी चिंतामणी ,सुरेखा डख,,रेखा चिंतामणी , शारदा काळे ,नीता डख, सुनीता ताई तिघुले,, संगीता ताई जाधव , मंदाताई काटे, चंदाताई धुमाळ, तसेच वार्डातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत