पदवीधरांच्या भक्कम पाठिंब्यावर बोराळकर यांचा विजय निश्‍चित - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


प्रतिनिधी

मागील पंचवार्षिक मध्ये पदवीधर निवडणुकीदरम्यान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे अपघाती निधन झाले होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही भारतीय जनता पार्टी पूर्णपणे स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या निधनामुळे दुःखात होती त्यामुळे निवडणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि शिरीष बोराळकर यांचा पराभव झाला परंतु यावेळी मात्र पदवीधरांचा भक्कम पाठिंबा आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जालना येथील निवासस्थानी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली यावेळी राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची उपस्थिती होती 

प्रत्येक बूथ पर्यंत शिस्तबद्ध रचना करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी करण्यात आली आहे त्यामुळे यावेळी बोराळकर यांचा विजय निश्चित होईल असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश