डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरातच अभिवादन करावे - अर्जुन पाडेवार
परतुर प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी दादर मुंबईला न जाता आप आपल्या घरातच सुरक्षित राहून अभिवादन करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केले आहे.
सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले असुन राज्यात कोरोना रोगाचा वाढता प्रभाव पाहुन सर्व आंबेडकर अनुयायांनी शासनाच्या नियमाच्या अधिन राहुन शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे गर्दी न कराता आप आपल्या गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व बौद्ध विहारात फक्त पाच पाच व्यक्तीनी जमा होऊन दीपप्रज्वलन, बौद्ध वंदना घेऊन अभिवादन करावे, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या घरातच सामूहिक बौद्ध वंदना घेऊन अभिवादन करावे असे आव्हान ही पाडेवार यांनी केले आहे.