नेरसह जालना तालुक्यातील शाळा खोली बांधकाम भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा=भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड


प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील नेर येथील दोन शाळा खोल्यांमध्ये बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून असाच भ्रष्टाचार तालुक्यातील इतर शाळा खोली बांधकाम मध्ये सुद्धा झालेला असू शकतो त्‍या सर्व शाळा खोल्यांची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड यांनी केली आहे.

नेर येथील दोन शाळा खोल्यांच्या बांधकामामध्ये अंदाजपत्रकात प्रमाणे कोणतेही काम झालेले नसून तरी देखील उपअभियंता टोम्पे यांनी अंदाजपत्रकानुसार काम झाले असल्याबाबतची लेखी जि प श्रीमती निमा अरोरा व तक्रारदार गजानन उफाड यांना कळवले आहे प्रत्यक्षात अंदाज पत्रकाप्रमाणे ऍशब्रिक चा वापर करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता डाखोरे उप अभियंता टोम्पे, तत्कालीन उपअभियंता फारुकी व ठोके पाटील यांनी संगनमताने शासनाची दिशाभूल केली असून संबंधित कंत्राटदारासोबत अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा संशय गजानन उफाड यांनी व्यक्त केला आहे.

*अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालं आहे की नाही हे सांगण्यास कार्यकारी अभियंता डाखोरे यांची टाळाटाळ*
उपअभियंता टोम्पे यांनी सदरील शाळा खोली बांधकाम अंदाज पत्रकाप्रमाणे झाले आहे असे लिहून दिले आहे असे असताना कार्यकारी अभियंता श्री डाखोरे यांना याबाबत विचारले असता अंदाज पत्रकाप्रमाणे काम झाले आहे किंवा नाही हे सांगण्यास मात्र टाळाटाळ करत आहेत उपअभियंता टोम्पे किंवा कार्यकारी अभियंता डाखोरे दोघांपैकी कुणितरी खोटं बोलत आहे, यामुळे या प्रकरणात झालेल्या अर्थपूर्ण व्यवहाराच्या संशयात डाखोरे आहेत की काय अशी शंका आतापर्यंत नव्हती परंतु आता येऊ लागली असल्याचे गजानन उफाड यांनी सांगितले

*खोटा अहवाल देऊन उप अभियंता टोम्पे यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांची केली दिशाभूल*
नेर येथील शाळा बांधकाम बाबत गजानन उभाड यांनी केलेल्या तक्रारीनुसार तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देणेबाबत सीईओ निमा अरोरा यांनी सूचना केली होती त्यानुसार प्रत्यक्ष तक्रारदाराला समोर बोलतात संबंधित कंत्राटदाराची संगणमत करून परस्पर अहवाल तयार केला व खोटा अहवाल सीईओ श्रीमती निमा अरोरा यांना सादर करून संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करण्यासाठी टोम्पे यांनी पुढाकार घेतला होता टोम्पे यांनी प्रत्यक्षात कोणतीही पाहणी केली नसून धाब्यावर बसून अहवाल दिला असल्याचा आरोप गजानन उफाड यांनी केला आहे ऍशब्रिक्स चा वापर करणे आवश्यक असताना ब्लॉक चा वापर करून बांधकाम करण्यात आले परंतु प्रत्यक्ष पाहणी अहवालात मात्र अंदाज पत्रकाप्रमाणे काम झाले असल्याचे टोम्पे यांनी लेखी दिले आहे

 *सीईओ अरोरा यांना सहज फसवता येऊ शकतं !*
दस्तुरखुद्द श्रीमती निमा अरोरा यांना टोम्पे यांनी खोटा अहवाल सादर केल्यामुळे सीईओ निमा अरोरा यांचा कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नाही असेच दिसून येत आहे जिल्हा परिषद सीईओ पदावर असणाऱ्या अरोरा यांना सहजरीत्या फसवले जाऊ शकते असे उपअभियंता टोम्पे खासगीत अत्यंत अभिमानाने सांगतात हे विशेष.
- गजानन उफाड

..... तर स्वखर्चाने बांधकाम करून देण्यासाठी तयार - गजानन उफाड
प्रत्यक्ष चौकशीदरम्यान बांधकाम करण्यात आलेली एखादी भिंत पाडण्यात यावी व त्यामध्ये ऍशब्रिक्स चा वापर करण्यात आला आहे की ब्लॉकचा याची शहानिशा करण्यात यावी जर अंदाज पत्रकाप्रमाणे ऍशब्रिक्सचा वापर करण्यात आला असेल तर पाडलेला भिंतीचे बांधकाम स्वखर्चाने करून देण्यास आपण तयार असल्याचे लेखी स्वरूपात भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड यांनी कार्यकारी अभियंता डाखोरे व उपअभियंता टोम्पे यांना कळवले आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले