अखेर दिशा ठरली... दुसर्‍या बैठकीला पत्रकारांचा उत्साही प्रतिसादनव्या संघटनेच्या घटनेला दुरुस्तीसह पत्रकारांची संमती


जालना ( प्रतिनिधी-) जालना जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात येत असलेल्या पत्रकार संघटनेची घटना-संहिता ठरविण्याची दिशा अखेर निश्‍चित करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजनाची दुसरी बैठक रविवारी (दि. 20) पार पडली असून, या बैठकीत घटना-संहिता सर्वांसमोर मांडण्यात आली. तथापि, त्यात काहीजणांनी दुरुस्ती आणि सुचनावजा मुद्दे मांडले. तर काही दुरुस्तींसह संघटनेच्या घटनेला सर्व पत्रकारांनी हात उंचावून संमती दिली. या बैठकीला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घटना-संहिता निश्‍चितीसोबतच संघटना वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
येथील भोकरदन नाका परिसरातील आयएमए हॉलमध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दै. रामविचारचे कार्यकारी संपादक विजयकुमार सकलेचा यांची तर घटना-संहिता समितीचे अध्यक्ष दै. युवा आदर्शचे संपादक दिपक शेळके, दै. मराठवाडा लोकप्रश्‍नचे संपादक अभयकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीच्या सुरुवातीला श्री. शेळके यांनी संघटनेसाठी बनविण्यात आलेली घटना संहिता सर्वांसमोर मांडली. त्यात प्रामुख्याने नव्याने अस्तित्वात येणारी संघटना ही पत्रकार आणि वृत्तपत्रांसाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, पत्रकारांवर होणारे हल्ले असो किंवा पत्रकारांच्या गृहनिर्माणाचा प्रश्‍न असो... यासह सामाजिक व शासनस्तरावरील पत्रकार-वृत्तपत्रांसाठीच्या योजना संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पत्रकारांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी बचतगट, पतसंस्था, पत्रकार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच कायदे-न्याय मंडळ, सल्लागार मंडळांची निर्मितीसह मदत केंद्राची स्थापना करून पत्रकार आणि वृत्तपत्रांना येणार्‍या अडी-अडचणी सोडविण्यावर संघटेनच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. पत्रकार किंवा वृत्तपत्रात नोकरी करण्यांच्या प्रश्‍नांसदर्भात वृत्तपत्र व्यवस्थापनाशी चर्चा करून दोघांच्या हितासाठीही संघटना प्रयत्नशील राहणार आहे. शिवाय पत्रकारांच्या हक्क व न्यायासाठी वेळप्रसंगी लढा उभारण्याचीही संघटनेची तयारी असणार आहे. याच अनुषंगाने विविध बाबींचा आणि विषयांचा संहिता घटनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती श्री. शेळके यांनी दिली. सुरुवातीच्या काळात संघटन केवळ जालना जिल्ह्यापुरते कार्यरत राहील येथे संघटनेच्या माध्यमातून विधायक कामे करून संघटनेचा ठसा उमटविल्यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये संघटनेचा विस्तार करणार असल्याचेही यावेळी श्री शेळके यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थितांनी घटना संहितेचे अवलोकन करुन त्यात काही दुरुस्तीवजा सुचना केल्या असता आवश्यक ते विषय स्विकारण्यात येवून घटना संहितेत दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन श्री. शेळके यांनी दिले. शिवाय अनेक पत्रकारांनी निश्‍चित करण्यात आलेल्या घटना संहितेचे स्वागत केले. तसेच घटना संहितेला दुरुस्तीसह सर्व संमती मिळाली असली तरी अंतिम शिक्कामोर्तब करण्यापुर्वी सर्वांना मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅपव्दारे घटना संहितेची पिडीएफ प्रत पाठविण्यात येणार असून, संबंधीतांनी त्यानंतर दोन दिवसात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवाव्यात. त्यानंतर घटना संहितेवर अंतिम शिक्कामोर्तब केला जाणार असल्याचेही या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. आजघडीला तयार असलेली घटना-संहिताही या बैठकीत एकमताने मंजुर करण्यात आली आहे हे विशेष. या घटना-संहितेच्या मुद्द्यांवर ज्येष्ठ पत्रकार श्रीमती आयेशा मुलाई, पारसनंद यादव, दिलीप पोहनेरकर, शेख चांद पी.जे., विकास बागडी, सुशीलकुमार वाठोरे यांच्यासह उपस्थित पत्रकारांनी सहभाग नोंदविला. पत्रकार भवनाचा मुद्दा ही बैठकीस पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर पत्रकारांचे हित जोपासणार्‍या इतर संघटना यांना वेळोवेळी सहकार्य करणे आणि त्यांच्याकडून सहकार्य घेणे या बाबी आपल्या संघटनेच्या माध्यमातून केल्या जातील. पत्रकर म्हणून सर्व एक आहोत. मात्र, दुसर्‍यांच्या मालमत्तेवर आपल्याला हक्क सांगता येणार नाही. भविष्यात आपण नविन पत्रकार भवनाची निर्मिती करू असा विश्‍वासही श्री शेळके यांनी उपस्थितांना दिला. त्यात ग्रामीण पत्रकारांचाही समावेश होता. बैठकीचे सुत्रसंचलन दै. मराठवाडा केसरीचे जिल्हा प्रतिनिधी अच्युत मोरे यांनी केले. तर बैठकीला पत्रकार दै. आनंदनगरीचे संपादक रविंद्र बांगड, दै. पार्श्‍वभूमीचे कृष्णा पठाडे, रुख्मिणीकांत दिक्षीत, दै. बदलता महाराष्ट्रचे मनोज कोलते, सायं दै. राजुरेश्वरचे महेश जोशी, अहेमद नूर, दै. तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी महेश बुलगे, दै. आनंद नगरीचे प्रतिनिधी गणेश काबरा, सा. मुक्त पत्रकारचे सय्यद नदीम फहीम, दै. पत्रकार वार्ताचे शेख इलियास अब्बास, दै. लोकनायकचे जिल्हा प्रतिनिधी सोनाजी झेंडे, दै. दुनियादारीचे मधुकर मुळे, सा. मॉवार्ताचे बाबासाहेब वानखेडे, सा. जालनाहितचे राहुल वाहुळे, सा. चित्ररेखाचे बालाजी अडियाल, सा. जनकपुर पत्रिकाचे ओमप्रकाश शिंदे, सा. नवप्रकाश दर्पणचे शेख उमर शेख अमिर, शेख इस्माईल शेख उमर, सा. मेरी आवाज सुनोचे शेख नबी सिपोराकर, दै. कासिद ए वक्तचे अशफाक पटेल, दै. पुष्टभूमीचे विलास गायकवाड, दै. जगमित्रचे आनंद शिंदे, दै. कालदंडचे शेख चांद पी.जे., दै. दौर ए इंकलाबचे शेख मतीन, लोकतंत्र समाचारचे  शेख शकील, शंकर शिरगुळे, दै. बीडचा लोकप्रश्‍नचे जिल्हा प्रतिनिधी भगवान साबळे, सा. जालना जिल्हा वैभवचे अंकुश गायकवाड, दै. झुंजार नेताचे शिवाजी म्हस्के, सा. आ.भारतचे रामेश्‍वर उबाळे, दै. राजुरेश्वरचे गोपाल त्रिवेदी, राहुल मुळे, नारायण काळे, दै. लोकरत्नचे रमेश गंगोदक, सा. अधिपतीच्या सौ. मनिषा ढिलपे, सा. स्वप्नभूमीचे मिलींद सावंत, दै. एशिया एक्सप्रेसचे मोहम्मद अझहर फाजील, सा. लोकाधिकारचे शब्बीर पठाण, सा. प्रभा प्रतिभाचे नरेंद्र जोगड, एमसीएन न्यूज चॅनलचे सुनील खरात, सा. भ्र.वि.लोकाधिकारचे सय्यद अफसर, शाहनवाज कुरेशी आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड