भाजप युवामोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केलेल्या संघटनात्मक कामाचा त्रैमासिक कार्य अहवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर,राहुल लोणीकर यांना देवेंद्रफडणवीसांची कौतुकाची थाप

परतूर प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीचा व युवा मोर्चाने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचा त्रैमासिक अहवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल लोणीकर यांनी केलेल्या मराठवाड्यातील संघटनात्मक बांधणीच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना युवकांना सन्मान प्राप्त करून देणारी आत्मनिर्भर भारत ही योजना तळागळातील युवांच्या आर्थिक उन्नतीचे साधन बनावी यासाठी राहुल लोणीकर यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवत संघटन मजबुती मध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान राहुल लोणीकर यांनी केले असल्याचे देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले.

राहुल लोणीकर यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमापासून आत्ताच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीपर्यंत चा सविस्तर समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी व युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या जी यांच्यावर पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठवाडाभर राबविण्यात आलेल्या निषेध आंदोलनांचा समावेश करण्यात आला आहे. शरद पवारांना पाठवलेले "जय श्रीराम" लिहिलेली 20 हजार पत्रे, ममता बॅनर्जी निषेध, सेवा सप्ताह, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सॅनिटायझर वाटप, अभाविप विद्यार्थी हल्ला निषेध, मराठा आरक्षण, पदवीधर निवडणूक, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठवाडा दौरा, जम्मू काश्मीर मधील भाजप युवामोर्चा पदाधिकारी हत्या केल्याप्रकरणी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध, युवकांच्या विविध प्रश्नांवर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट, आत्मनिर्भर भारत केंद्र, विवेकानंद राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव, अर्णब गोस्वामी समर्थन, यासह अनेक कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे

यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चाच्या कामकाजाची व मराठवाडाभर युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती राहुल लोणीकर यांच्याकडून घेतली व युवामोर्चा उत्तम काम करत असल्याबद्दल विक्रांत पाटील, राहुल लोणीकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा चे कौतुक केलं

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले